Havells 1200mm Festiva Energy Saving Ceiling Fan (किंमत २,८९८ रुपये)
या हॅवेल्स सीलिंग फॅनचे युजर रेटिंग ४.५ स्टार इतके आहे. हा फॅन आकर्षक एस्प्रेसो ब्राऊन रंगामध्ये येत असून हा सिलिंग फॅन तुमच्या राहत्या घराचे आणि बेडरूमचे सौंदर्य आणखी वाढवू शकतो. दिसायला भारी असणारा हा फॅन तितकाच जोरदार वारा देतो. याची मोटर 100% तांब्यापासून बनलेली आहे. यात ऊर्जा कार्यक्षम इंडक्शन मोटर आहे जी कमी उर्जा वापरते.
वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक
Atomberg 1200mm BLDC Motor 5 Star Rated Ceiling Fans (किंमत ३,५८० रुपये)
हा सीलिंग फॅन बीएलडीसी मोटरसह येत आहे, जो कमी वीज वापरुन अधिक चांगली हवा देऊ शकतो. याला फाइव्ह स्टार एनर्जी रेटिंग मिळाली असून २८ वॅट मोटरसह हा फॅन येत आहे. मॅट ब्लॅक कलरमध्ये हा फॅन उपलब्ध असून ३ वर्षांची वॉरंटी देखील आहे. विशेष म्हणजे हा फॅन तुम्ही रिमोटद्वारेही नियंत्रित करू शकता.
वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा
CROMPTON SUREBREEZE SEA Sapphira Ceiling Fan (किंमत १, ४९९ रुपये)
हा तपकिरी रंगाचा सिलिंग फॅन या यादीत अगदी कमी बजेटमध्ये एक भारी पर्याय आहे. Amazon वरुन हा फॅन अवघ्या १,४९९ रुपयांना तुम्ही घेऊ शकता. हा सीलिंग फॅन मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी वापरला जाऊ शकतो. या फॅनमध्ये डबल बॉल बेअरिंग मिळेल. हे बेअरिंग 100% कॉपर मोटरपासून बनवलेले असून 380 rpm हायस्पीड मोटर यात आहे. यात 380 rpm ची हायस्पीड मोटर आहे.
वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!
GM Air MT Ceiling Fan Brown 1200MM (किंमत १,५९९ रुपये)
हा देखील एक कमी बजेटमध्ये चांगला फॅन आहे. १,५९९ रुपये इतकी किंमत असणारा हा प्रील्युब्रिकेटेड क्लोज टाईप डबल बॉल बेअरिंगसह येणारा अप्रतिम तपकिरी रंगाचा सीलिंग फॅन आहे. हा लिव्हिंग रूमसाठी योग्य आहे. यामध्ये तुम्हाला 373 rpm ची हायस्पीड मोटर मिळत आहे. हा सीलिंग फॅन जास्त आवाजही करत नाही आणि जोरदार हवाही देतो. हा सीलिंग फॅन शाळा आणि दुकानांमध्ये बसवण्यासाठी देखील भारी आहे.
वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात
Orient Electric I-Tome Smart BLDC Ceiling fan (किंमत ५,७०० रुपये)
हा एक उत्तम बीएलडीसी सीलिंग फॅन आहे. यावर तुम्हाला ३ वर्षांची ऑनसाइट वॉरंटी दिली जात आहे. हा सीलिंग फॅन फक्त 28 वॅटचा आहे आणि खूप कमी वीज वापरतो. हा अतिशय आकर्षक अशा सोनेरी रंगात येत आहे. विशेष म्हणजे हा फॅन रिमोटद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो.
वाचा : समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक