ठाणे महापालिकेच्या परिसरात इंग्रजी माध्यमांच्या ४२, मराठी माध्यमांच्या दोन आणि हिंदी माध्यमांच्या तीन अशा ४७ शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांनी सरकारची मान्यता न घेताच अनधिकृतपणे शाळा चालविल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत शाळांमध्ये करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या शाळांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
या अनधिकृत शाळा-वर्ग तत्काळ बंद न केल्या संबंधित संस्थाचालकांविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई होईल. तसेच नोटीस देऊनही या अनधिकृत शाळा बंद न केल्यास एक लाख दंड वसूल केला करण्याची कारवाई होऊ शकते. त्यातूनही शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिन दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे.
दरम्यान, २५ हून अधिक अनधिकृत शाळा दिव्यात असल्याचे शिक्षण विभागाने नोंदवले आहे.
अनधिकृत शाळांची यादी
अलहादी मक्तब अँड पब्लिक स्कूल (राबोडी), ड्रीम वर्ल्ड इंग्लिश स्कूल (कळवा), प्रभावती इंग्लिश स्कूल (कळवा),डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय(कळवा), आरंभ इंग्लिश स्कूल (श्रीगणेशनगर चाळ), बुरहानी स्मार्ट चॅम्पस(साई हॉस्पिटल जवळ), न्यू गुरूकूल इंग्लिश स्कूल (दिवा), आगापे इंग्लिश स्कूल(दिवा), नालंदा हिंदी विद्यालय (दिवा), मूनस्टार ग्लोबल इंग्लिश स्कूल (कौसा), जिनियस इंटरनॅशनल स्कूल(मुंब्रा), आदर्श विद्यालय (दिवा), रेन्बो इंग्लिश स्कूल (दिवा), सिम्बॉयसेस हायस्कूल (दिवा), जीवन इंग्लिश स्कूल (दिवा), एम.एस.इंग्लिश स्कूल(दिवा), कुबेरेश्वर स्कूल(दिवा), आर.एल.पी. हायस्कूल (दिवा), आदर्श गुरूकुल हायस्कूल ( इंग्रजी व मराठी माध्यम, दिवा), श्री दत्तात्रय कृपा इंग्लिश स्कूल (दिवा), एस.आर.पी. इंग्लिश स्कूल (दिवा), एस.एस. मेमोरियल इंग्लिश स्कूल (दिवा), ओम साई इंग्लिश स्कूल(दिवा), स्टार इंग्लिश हायस्कूल (दिवा), श्री विद्या ज्योती इंग्लिश स्कूल (दिवा), केंब्रिज इंग्लिश स्कूल (दिवा), पब्लिक इंग्रजी व मराठी स्कूल (दिवा), टि्ंवकल स्टार इंग्लिश स्कूल (दिवा), जे. डी. इंग्लिश स्कूल (मुंब्रा), होली एंजल इंग्लिश स्कूल(टाटा पावर), आर्या गुरूकुल इंग्लिश स्कूल (दिवा), सेंट सायमन हायस्कूल (दिवा), शिवदिक्षा इंग्लिश स्कूल (दिवा), श्री रामकृष्ण इंग्लिश स्कूल (दिवा), होली मारिया कॉन्व्हेंट हायस्कूल (दिवा), होली ट्रिनिटी इंग्रजी स्कूल (घोडबंदर रोड), अबाबील्स इंग्लिश स्कूल (भोलेनाथ नगर), हसरा इंग्लिश स्कूल (कौसा), लिटिल एंजल्स प्रायमरी (मुंब्रा), आयशा इंग्लिश प्रायमरी स्कूल (कल्याण फाटा), दि कॅम्पेनियन हायस्कूल (मुंब्रा), इकरा इस्लामिक स्कूल अँड मक्तब (कौसा), शिवाजी माध्यमिक विद्यालय(सुभाषनगर, ठाणे), नारायणा ई टेक्नो स्कूल (बाळकूम, ठाणे)