नवी दिल्ली : Apple iPhone 11 Price : ॲपल कंपनीचा कोणताही फोन असो तो चर्चेत असतोच. आता काही वर्षांपूर्वी आयफोन 11 लॉन्च झाल्यानंतर तो देखील ट्रेंडमध्ये आला होता. यामागे अनेक कारणं होती. पण आता त्यानंतर आयफोन १२, आयफोन १३, आयफोन १४ आल्यानंतर आता आयफोन १५ ही येणार आहे. त्यामुळे हा आयफोन ११ बंद होणार असून सध्या अगदी बंपर डिस्काउंटसह मिळत आहे. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. कारण सध्या तुम्हाला या फोनवर मोठी सूट मिळत आहे.
तुम्ही Flipkart वरून APPLE iPhone 11 (व्हाइट, 128GB) ऑर्डर करू शकता. या फोनची मूळ किंंम ४८,००० रुपये आहे आणि तुम्ही १२% डिस्काउंटनंतर फक्त ४२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. SBI क्रेडिट कार्डने व्यवहार करताना इतर अनेक फायदे होऊ शकतात. म्हणजेच एकंदरीत कार्डने पैसे भरल्यानंतरही तुम्हाला आणखी बंपर फायदा मिळत आहे. याशिवाय, आता एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फोनवर तुम्हाला आणखी सूट मिळू शकते. तुम्हाला फक्त एक्सचेंज ऑफर अंतर्गत जास्तीत जास्त सूट मिळत आहे. २८,००० रुपयांचीही सूट मिळू शकते. पण एवढी सवलत मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेल तितकच भारी हवं.

वाचा : आता अनोळखी नंबर होणार Mute, WhatsApp घेऊन येतंय एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स
कसे आहेत स्पेसिफिकेशन्स?
आयफोन ११ च्या स्पेसिफिकेशन्सचा विचार केला तर, या फोनमध्ये ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्यातील प्राथमिक कॅमेरा 12MP आहे. तसेच, फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असणार आहे. फोनमध्ये A13 बायोनिक चिप प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.
वाचा : आनंदाची बातमी! आता प्रत्येक फोनमध्ये FM Radio मिळणार, सरकारचे कंपन्यांना आदेश