तर POCO C50 या स्मार्टफोनची भारतात किंमत ८,९९९ रुपये इतकी आहे. पण या फोनच्या २जीबी रॅम आणि ३२जीबी स्टोरेज वाल्या मॉडेलची किंमत ५,७४९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तब्बल ३६ टक्के सूट देण्यात आली. विशेष म्हणजे या फोनची किंमत अधिकच्या बँकिंग ऑफर्समुळे आणखी कमी झाली आहे. तर हा फोन विकत घेताना जर Flipkart Axis Bank कार्डचा वापर केला तर ५ टक्के आणखी कॅशबॅक मिळू शकतं. ज्यामुळे किंमत ५५०० रुपयांपेक्षा कमी होऊ शकते. तसंच Paytm Wallet आणि इतर पेमेंट ऑप्शन्सवरही सूट मिळत आहे. याशिवाय जुना फोन एक्सचेंज केल्यावर आणखी सूट मिळू शकते.
वाचा : iPhone 11 बंद होत आहे? अगदी अर्ध्या किंमतीला करु शकता ऑर्डर
कसा आहे POCO C50?
कंट्री ग्रीन आणि रॉयल ब्लू या दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे. फोनचा डिस्प्ले ६.५२ इंचाचा आहे. यामध्ये 120Hz टच सँपलिंग रेट असून POCO C50 रेअर पॅनलला ८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह सेंकजरी डेप्थ कॅमेराही आहे. तसंच सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा असून बॅटरी बॅकअप तगडा मिळावा यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
वाचा : आनंदाची बातमी! आता प्रत्येक फोनमध्ये FM Radio मिळणार, सरकारचे कंपन्यांना आदेश