सोनियांनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होणार; भाजप म्हणतो…

हायलाइट्स:

  • सोनिया गांधी यांनी बोलावली भाजपेतर मुख्यमंत्र्यांची बैठक
  • उद्धव ठाकरे देखील बैठकीत सहभागी होणार
  • भाजपची ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांत टीका

मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येत्या २० ऑगस्टला भाजपेतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही संधी साधत महाराष्ट्र भाजपनं ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. (BJP Taunts Thackeray Government Over Meeting Called by Sonia Gandhi)

राज्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संदर्भात ट्वीट करण्यात आलं आहे. ‘हमने पहलेही कहा था… सोनिया जिसकी मम्मी है, वो ठाकरे सरकार निकम्मी है। असं हे हिंदी भाषेतील ट्वीट आहे. ‘हे नाकर्ते सरकार असून सोनिया गांधी ह्याच ठाकरे सरकारच्या ‘मातोश्री’ आहेत हे आम्ही आधीच सांगितलं होतं,’ असं त्यात म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची माहिती दिली आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या घरी नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. आता सोनियाजींनी सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी ही बैठक होईल. उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होतील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ‘विरोधकांमध्ये एकजूट आहे आणि ही ताकद आणखी वाढावी यासाठी प्रयत्न केला जाईल,’ असं ते म्हणाले. अर्थात, या बैठकीबाबत काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी त्यास दुजोरा दिलेला नाही.

आणखी वाचा:

बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या सत्कार; निमंत्रितांच्या यादीत ‘या’ दिग्गजांचा समावेश

रावसाहेब दानवे यांच्यावर माजी खासदाराचे खळबळजनक आरोप

लोकलचा पास मिळवण्यासाठी इतक्या अटी का?; भाजपला ‘ही’ शंंका

Source link

BJP on Meeting Called by Sonia GandhiBJP Taunts Thackeray SarkarSanjay RautSonia Gandhi to meet CMs of Congress-ruled statesThackeray to Attend Meeting Called by Sonia Gandhiभाजपची ठाकरे सरकारवर टीकाभाजपेतर मुख्यमंत्र्यांची बैठकसोनिया गांधी
Comments (0)
Add Comment