CUET: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठांतील प्रवेश पध्दती स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना केली. त्यामार्फत केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) आयोजित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. केंद्रीय पातळीवर सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना देशभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक खिडकी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी यंदाच्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश चाचणी परीक्षेचे (सीयूईटी) वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार ५ ते १२ जूनदरम्यान या परीक्षा होतील. या कालावधीत सर्व दिवशी परीक्षांसाठी विद्यार्थी cuet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठांतील प्रवेश पध्दती स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची स्थापना केली. त्यामार्फत केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) आयोजित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. केंद्रीय पातळीवर सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना देशभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक खिडकी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीयूईटीसाठी अर्ज कसा कराल?
– अर्ज करण्यासाठी cuet.nta.nic.in हे संकेतस्थळ उघडा
– पहिल्या पानावरील नोंदणी या लिंकवर जाऊन नवीन नोंदणीवर क्लिक करा
– तुमचे नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती भरा
– नोंदणी केल्यानंतर, तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड ठरवा
– आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा
– भरलेली माहिती सेव्ह करा, सबमिट करा आणि चाचणी शुल्क भरा
– तुमच्या संदर्भासाठी भरलेला व मान्य झालेला अर्ज डाउनलोड करून ठेवा.