मुंबई- एकीकडे अदा शर्मा स्टारर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबाबत रोज नवीन गोंधळ निर्माण होत आहे तर दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुदीप्तो सेनच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाने पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अदा शर्माच्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ला मागे टाकले आहे.द केरला स्टोरीच्या सुरुवातीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. sacnilk या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ‘द केरल स्टोरी’ने पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारीही बंपर कमाई केली आहे. सिनेमाने सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानच्या पाचव्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. सलमानच्या चित्रपटाने पाचव्या दिवशी ६.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘द केरल स्टोरी’ने पाचव्या दिवशी ११ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच पाचव्या दिवशी जिथे बॉक्स ऑफिसवर सलमानच्या चित्रपटाचा रंग फिका पडू लागला होता, तिथेच ‘द केरल स्टोरी’चा रंग चढू लागला आहे.
आसाराम बापूच्या वकिलाने मनोज बाजपेयीच्या सिनेमाला पाठवली नोटीस, म्हणे भावना दुखावल्यासिनेमाने पाच दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला
या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण ३३.२५ कोटींची कमाई केली आहे. यानंतर, पहिल्या सोमवारी कमाईचा आकडादेखील उत्कृष्ट होता ‘द केरल स्टोरी’ने चौथ्या दिवशी १० कोटी रुपयांच्या कमाईसह ४३.२५ कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशीही या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला. एकूण पाच दिवसांत या चित्रपटाने ५४.२५ कोटींची कमाई केली आहे.
कुठे सिनेमावर बंदी तर कुठे टॅक्स फ्री
मुंबई, यूपी, बिहार, दिल्ली-एएनआर, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि बेंगळुरूमध्ये हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. तर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारख्या अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. याउलट सिनेमावरून झालेल्या गदारोळानंतर तमिळनाडू आणि केरळमधील शो बंद करण्यात आल्याची चर्चा होती. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यात १० कट सुचवले होते.
The Kerala Story ला टक्कर मिळणार, जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात महाराष्ट्र शाहीरचे मोफत शो
Source link