Google I/O 2023: आज होणार गुगलचा सर्वात मोठा इव्हेंट, पिक्सेल फोल्डसह अनेक उत्पादनं होणार लॉन्च

नवी दिल्ली :Google I/O 2023 Event : Google ची वार्षिक विकासक परिषद म्हणजेच Google I/O 2023 आज रात्री सुरू होत आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार या वर्षीच्या Google I/O मध्ये अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. यामध्ये कंपनी आपला पहिला Pixel टॅबलेट लॉन्च करू शकते. यासोबतच कंपनीचा पहिला फोल्डिंग स्मार्टफोन Pixel Fold देखील यावेळी लॉन्च केला जाऊ शकतो. या दरम्यान Pixel 7a अधिकृतपणे सादर केला जाऊ शकतो. Google AI आणि त्याच्या जनरेटिव्ह AI चॅटबॉट बार्डबद्दल देखील येथे बोलले जाईल. सीईओ सुंदर पिचाई यांच्या मुख्य भाषणाने शो सुरू होईल.

Google I/O 2023 कसे पाहाल?

Google I/O 2023 यावेळी ऑफलाईन होणार आहे. पण तुम्ही लाईव्ह स्ट्रिमिंगही पाहू शकता. तुम्ही ते YouTube वर पाहू शकता. Google I/O की नोट रात्री १०.३० वाजता सुरू होईल आणि त्यानंतर डेव्हलपर की नोट होणार आहे.

नवनवीन प्रोडक्ट होणार लाँच

कार्यक्रमात अनेक उत्पादने लॉन्च केली जाऊ शकतात. Pixel 7a हा फोनही लाँच होऊ शकतो. गुगलने आधीच खुलासा केला आहे की हा फोन ११ मे रोजी फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. Pixel 7a बद्दल बोलायचे झाले तर, हा मिड-बजेट सेगमेंटमध्ये सादर केले जाईल. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Pixel 7a ची किंमत सुमारे ४५,००० रुपये असू शकते. या फोनमध्ये नवीन चिपसेट दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये Tensor G2 हा चिपसेट दिला जाऊ शकतो.
तसंच आणखी एक प्रोडक्ट म्हणजे Google Pixel Fold बद्दल बोलायचं झाले तर, हा फोन बाजारात आधीपासून असलेल्या Samsung Galaxy Z Fold 4 आणि Oppo Find N2 ला टक्कर देऊ शकतो. यामध्ये Google Tensor G2 SoC देखील दिले जाऊ शकते. फोनच्या मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये तीन सेन्सर असतील. रुंद कॅमेरा, अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेरा असू शकतो. याशिवाय Pixel टॅबलेट बद्दल बोलायचे झाले तर यात 10-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याची किंमत सुमारे ५०,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

google eventgoogle io 2023google pixelgoogle showगुगलगुगल इव्हेंट
Comments (0)
Add Comment