आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आदिपुरुष म्हणजे काय असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे. आदिपुरुष कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर खुद्द भगवान विष्णूंनाही जाणून घ्यायचे होते. कारण जेव्हा ते ब्रह्मांडात प्रकट झाले तेव्हा त्यांना विश्वात फक्त पाणीच दिसत होते. त्यांना स्वतःबद्दलही काही माहीत नव्हते. भगवान विष्णूंना ते आदिपुरुष आहेत हे माहितच नाही होते. त्याचवेळी आकाशवाणी झाली की आदिपुरुषाला जाणण्यासाठी तपश्चर्या करा. आकाशवाणीनुसार भगवान विष्णू पाण्यात विराजमान होऊन तपश्चर्या करू लागले. भगवान विष्णूंचे नीर म्हणजेच पाण्यावर वास्तव्य असल्यामुळे त्यांना नारायण म्हटले गेले.मान्यता अशी आहे की, तपश्चर्येदरम्यान त्यांच्या नाभीतून एक दिव्य कमळ प्रकट झाले आणि नंतर त्या कमळावर ब्रह्माजी प्रकट झाले. ब्रह्माजी भगवान विष्णूला नमस्कार करतात आणि त्यांना आदिपुरुष म्हणतात कारण त्यांच्यापुढे दुसरा कोणीही पुरूष प्रकट झाला नव्हता. भगवान विष्णू विश्वातील पहिल्या पुरुषाच्या रूपात अवतरले होते. म्हणूनच भगवान विष्णूंना आदिपुरुष म्हटले आहे.
आदिपुरुष भगवान विष्णूपासून जन्म मिळालेल्या परमपिता ब्रह्मदेवांनी विश्वाच्या निर्मितीचे कार्य पुढे नेले. म्हणूनच आदिपुरुषाच्या रूपात भगवान विष्णूची विश्वातील आरंभिक पुरुष म्हणून पूजा केली जाते. ज्यावेळी सत्यनारायणाची पूजा आणि कथा घरोघरी केली जाते, तेव्हा आदिपुरुष आणि अनादिपुरुष यांची पूजा सत्यनारायणासमोर केली जाते. कारण त्या आदिपुरुषाचा आरंभ किंवा अंत कोणालाच माहित नाही. आदिपुरुष हा आरंभ आणि अंत नसलेला आहे.
भगवान राम हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो. भगवान विष्णूच्या दहाव्या अवतारांमध्ये, भगवान रामाच्या आधी जे काही अवतार झाले, त्यांनी विश्वाची स्थापना आणि व्यवस्था करण्याचे काम केले. परंतु भगवान विष्णूंनी राम अवतारात मानवासाठी आदर्श व्यवस्था आणि मानवी मूल्यांची पायाभरणी केली होती. म्हणूनच सध्याच्या समाजात रामाला आदिपुरुष ही संज्ञाही दिली जाते. प्रभू राम हे आरंभिक पुरुष मानले जातात ज्यांनी सुसंस्कृत समाजाची व्याख्या केली.