आयफोन किंवा सॅमसंगमध्ये नाही तर ‘या’ फोनमध्ये आहे सर्वात मोठा कॅमेरा, DxOMark चा खुलासा

नवी दिल्ली :Huawei P60 pro Camera : स्मार्टफोनची क्वॉलिटी टेस्ट करणारी कंपनी DxOMark ने चायनीज कंपनी हुआवे अर्थात Huawei च्या Huawei P60 Pro मॉडेलच्या कॅमेऱ्याला बेस्ट कॅमेरा म्हणून घोषित केलं आहे. या फोनच्या कॅमेऱ्याने प्रिमीयम कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनच्या रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. या फोनने शर्यतीत असणाऱ्या ओप्पो फाईंड एक्स६ प्रो आणि ऑनर मॅजिक ५ प्रो ला मागे टाकलं आहे.

कॅमेरा रँकिंग स्कोरनुसार Huawei P60 pro च्या कॅमेऱ्यामधून काढलेल्या फोटोला १५९ पॉईंट मिळवले आहेत. बोकेह शॉटच्या फोटोसाठी ८० पॉईंट आणि प्रीव्यूसाठी ७५ पॉईंट मिलवले आहेत. तसंच झूम फीचरसाठी १५८ पॉईंट आणि व्हिडीओ सेक्शनमध्ये १४७ पॉईंट मिळवले आहेत.

वाचा : इन्स्टाग्रामचे फॉलोवर्स वाढवायचे आहेत? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Huawei P60 pro च्या कॅमेऱ्याचे खास फीचर्स
Huawei P60 pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये f1.4 ते f4.0 आणि OIS च्या वेरिएबल अपर्चल वाला ४८ मेगापिक्सल अल्ट्रा लाईटिंग कॅमेरा दिला आहे. तसंच f2.2 अपर्चर वाला १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेराही आहे. आणि f2.1 अपर्चर आणि OIS सोबत ४८ मेगापिक्सल वाला अल्ट्रा लाइटिंग टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.

वाचा : Google I/O 2023: आज होणार गुगलचा सर्वात मोठा इव्हेंट, पिक्सेल फोल्डसह अनेक उत्पादनं होणार लॉन्च

Huawei P60 pro चा कॅमेरा बऱ्याच गोष्टीत बेस्ट आहे. हा सर्वप्रकारच्या लाईट कंडीशनमध्ये भारी फोटो काढू शकतो. विशेष म्हणजे कमी लाईट असणाऱ्या जागी देखील अगदी भारी फोटो या कॅमेऱ्यातून येतील. Huawei P60 pro चा कॅमेराच या फोनला इतर फ्लॅगशिप फोन्सपेक्षा अधिक बेस्ट बनवतो. त्यामुळे चांगला कॅमेरा हवा असणाऱ्यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.

वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

big cameradxomarkhuawei p60 prosmartphone cameraकॅमेरास्मार्टफोनहुआई फोन
Comments (0)
Add Comment