Realme 11 मालिका प्रथमच मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. Realme 11 च्या 8GB + 256GB स्टोरेज प्रकारासाठी CNY 1,599 (अंदाजे रु. १८,००० भारतीय रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज प्रकारासाठी CNY 1,799 (अंदाजे रु. २१,००० भारतीय रुपये) अशी किंमत आहे.
Realme 11 Pro च्या 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी CNY 1,699 (अंदाजे २०,००० भारतीय रुपये) आणि 12GB + 256GB प्रकारासाठी CNY 1,999 (अंदाजे २४,००० भारतीय रुपये) इतकी किंमत आहे. तसंच 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंटची किंमत CNY 2,199 (अंदाजे २६,००० भारतीय रुपये) आहे.
Realme 11 Pro+ ची 12GB + 256GB रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटसाठी CNY 1,999 (अंदाजे २४,००० भारतीय रुपये) आणि 12GB + 512GB व्हेरिएंटसाठी CNY 2,299 (अंदाजे २७,००० भारतीय रुपये) इतकी किंमत आहे. तर 12GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलची किंमत CNY 2,599 (अंदाजे ३०,००० भारतीय रुपये) आहे.
या कलर्समध्ये उपलब्ध
Realme 11 फोन समर ऑरेंज आणि स्टार ट्रेल ब्लॅक कलर पर्यायांमध्ये येतो. तर Realme 11 Pro आणि Realme 11 Pro + सिटी ऑफ रायझिंग सन, सिटी ऑफ ग्रीन फील्ड आणि स्टाररी नाईट ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आले आहेत.
Realme 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये (1,080×2,412 पिक्सल) रिझोल्यूशनसह ६.७ इंच फुल HD+ कर्व्ह डिस्प्ले, 360Hz टच सॅम्पलिंग, 93:65 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि DCI-P3 कलर गॅमट फीचर्स आहे. फोनला TUV Rheinland फ्लिकर फ्री सर्टिफिकेशन दिले गेले आहे. तसंच Realme 11 Pro आणि Realme 11 Pro + ला Mali G68 GPU आणि Octa-core 6nm MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह 12 GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. रॅम हा 20GB पर्यंत वाढवता येईल. तसंच Realme 11 Pro मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये f/1.75 अपर्चरसह १०० मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचाही सपोर्ट आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सल्सचा सेकंडरी कॅमेरा आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सल सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.
Realme 11 Pro+ मध्ये 200MP कॅमेरा
कंपनीने Realme 11 Pro+ चे कॅमेरा फीचर्स अधिक भारी दिले आहेत. या फोनमध्ये “सुपर OIS” आणि F/1.69 अपर्चरसह २०० मेगापिक्सल सॅमसंग HP3 सेन्सरसह ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट दिलं आहे. फोनमधील सेकंडरी कॅमेरा f/2.2 अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आहे आणि तिसरा f/2.4 अपर्चर असलेला २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये f/2.45 अपर्चरसह ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
इतर फीचर्स
Realme 11 Pro चं स्टोरेज म्हणाल तर 512 GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे, तर Realme 11 Pro+ मध्ये 1 TB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे. दोन्ही प्रो मॉडेल्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. यामध्ये हाय-रेझ ऑडिओ सपोर्टसह ड्युअल लिनियर स्पीकर आणि ड्युअल मायक्रोफोनचा समावेश आहे. तसंच Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. Pro 67W फास्ट चार्जिंगसह येतो तर Realme 11 Pro+ मध्ये 100W चार्जिंग सपोर्ट आहे.
Realme 11 चे स्पेसिफिकेशन्स
Realme 11 मध्ये ड्युअल-सिम सपोर्ट, ९०.८ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह ६.४३ इंचाचा फुल-एचडी+ सॅमसंग AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये Octacore 7nm आधारित MediaTek Dimensity 6020 5G प्रोसेसर आहे, जो 12GB LPDDR4X रॅमसह येतो. Realme 11 मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा आहे, ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, समोर ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो