भारतातील Google Pixel 7a ची किंमत
Pixel 7a ला भारतात ४३ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. ८ जीबी रॅम आणइ १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची ही किंमत आहे. याची विक्री ११ मे पासून म्हणजेच आजपासून सुरू करण्यात येणार आहे. ही विक्री फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे. लाँचिंग ऑफर अंतर्गत यूजर्सला एचडीएफसी बँक कार्डचा वापर केल्यास थेट ४ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकणार आहे. या डिस्काउंट नंतर या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये होते. या फोनला चारकोल, स्नो आणि सी कलर मध्ये खरेदी करू शकता.
Google Pixel 7a चे फीचर्स
Google Pixel 7a मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सोबत ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले दिला आहे. याच्या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन दिली आहे. यात एचडीआर सपोर्ट सोबत येतो. फोनचा फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्ले मध्ये एम्बेडेड आहे. हा फोन Tensor G2 SoC सोबत येतो. यात टायटन एम २ सिक्योरिटीला प्रोसेसर दिले आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे स्टोरेज दिले आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वाय फाय, ब्लूटूथ व्ही ५.३ आणि एनएफसी सारखे फीचर्स दिले आहेत.
वाचाः अबब! 200MP कॅमेरा, 1TB स्टोरेज, डिस्प्लेसह डिझाइनही दमदार, Realme 11 सिरीजमधील फोन लाँच
फोनमध्ये 4385mAh ची बॅटरी दिली आहे. गुगलने पहिल्यांदा Pixel 7a सोबत वायरलेस चार्जिंग दिली आहे. हे Qi चार्जिंग स्टँडर्डचा सपोर्ट दिला आहे. Pixel 7a मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सोबत ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. याचा दुसरा सेन्सर अल्ट्रा वाइड अँगल सोबत येतो. ज्यात १३ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १३ सोबत येतो.
वाचाः Google Pixel 7a लाँच होताच Pixel 6a झाला स्वस्त, तब्बल १७,००० हून अधिकची सूट