Redmi 80 cm (32 inches) HD Ready Smart LED Fire TV:
रेडमी 80 सेमी (32 इंच) एचडी रेडी स्मार्ट एलईडी फायर टीव्हीची किंमत २४,९९९ रुपये आहे. पण ५० टक्के सूट या टीव्हीवर मिळत असल्याने हा टीव्ही आता १२,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीला Amazon वर ५ पैकी ४.१ रेटिंग देण्यात आले आहे. याशिवाय EMI वरही हा टीव्ही खरेदी करता येईल. यासाठी दरमहा ५९७ रुपये भरावे लागणार आहेत. जुन्या टीव्हीची एक्सचेंज केल्यास २,५०० रुपये ऑफ होऊ शकतात.
वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक
TCL (32 inches) Bezel-Less S Series HD Ready Smart Android LED TV:
टीसीएल (३२ इंच) बेझल-लेस एस सीरीज एचडी रेडी स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्हीची मूळ किंमत २०,९९० रुपये आहे. पण ४३ टक्के डिस्काउंटसह ११,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीला Amazon वर ५ पैकी ४.२ रेटिंग दिलं गेलं आहे. याशिवाय EMI वर देखील हा टीव्ही खरेदी करता येईल.EMI साठी दरमहा ५७३ रुपये भरावे लागतील. तुम्ही तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास तुम्हाला २,५०० रुपयांपर्यंतची सूट दिली जाईल. १,००० रुपयांची कूपन सवलत देखील उपलब्ध आहे.
वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा
Samsung 80 cm (32 Inches) Wondertainment Series HD Ready LED Smart TV
सॅमसंग 80 सेमी (32 इंच) वंडरटेनमेंट सीरीज एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्हीला अॅमेझॉनवर ५ पैकी ४.२ रेटिंग देण्यात आले आहे. २२,९०० रुपयांऐवजी हा टीव्ही सध्या ११,९९० रुपयांना खरेदी करता येईल. तसंच ५७३ च्या EMI वर देखील खरेदी करता येईल. घरातील जुन्या टीव्हीच्या एक्सचेंवर २,५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल.
वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!
OnePlus 80 cm (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV
OnePlus 80 सेमी (32 इंच) Y मालिका HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही सध्या ११,४९९ रुपयांना मिळत आहेत. याची मूळ किंमत १९,९९९ रुपये असून डिस्काउंटमुळे टीव्ही स्वस्तात मिळत आहे. Amazon वर ५ पैकी ४.२ रेटिंग या टीव्हीला आहे. दरमहा ५४९ रुपये भरून हा टीव्ही EMI वर घरी आणता येईल. जुन्या टीव्हीची एक्सचेंज केल्यास २५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात
योग्य ऑप्शनच निवडा
आता तुम्हीही एखादा स्मार्टटीव्ही घेणार असाल तर वर पाहिल्याप्रमाणे खूप सारे बजेट ऑप्शन्स तुम्हाला मिळतील पण खूप ऑप्शन्स पाहून गडबड करु नका स्मार्टटीव्ही घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की चेक करायला हव्या. तर टीव्ही खरेदी करताना, कलर व्हॉल्यूम, एचडीआर, रिफ्रेश रेट, एचडीएमआय कनेक्शन आणि एचडीआर हे सारं समजून घ्या, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.
वाचा : Google I/O 2023: आज होणार गुगलचा सर्वात मोठा इव्हेंट, पिक्सेल फोल्डसह अनेक उत्पादनं होणार लॉन्च