आता ट्विटरवरुनही ऑडिओ-व्हिडीओ कॉल करता येणार, पाहा काय म्हणाले Elon Musk?

नवा दिल्ली : काही दिवसांपूर्वी ब्लू टिकच्या मुद्द्यामुळे चर्चेत असणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण ट्विटर लवकरच काही नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे मुख्य कार्यकारी एलन मस्क यांनी याबाबत खुलासा केला आहे की लवकरच कॉलिंग आणि एनक्रिप्टेड मेसेज यांसारखे फीचर्स ट्विटरवर उपलब्ध होतील. गेल्या वर्षी (२०२२), मस्कने ‘ट्विटर 2.0 द एव्हरीथिंग ॲप’ ही संकल्पना सांगताना या सोशल मीडिया साइटवर आता एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेज (डीएम), दीर्घकालीन ट्विट आणि पेमेंट यासारखे नवीन फीचर्स उपलब्ध असतील, असं सांगितलं होते. आता मस्क यांनी ट्विट करून पुन्हा याची अधिकृत घोषणा केली आहे.वाचाः WhatsApp Tricks: व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढणार, फक्त या ट्रिक्स करा फॉलो

एलन मस्क यांनी ट्विट केलं की, ‘लवकरच या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या हँडलने व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करू शकाल, याच्या मदतीने तुम्ही फोन नंबरची देवाणघेवाण न करता जगभरातील कोणाशीही बोलू शकाल.’ दरम्यान आता ट्विटरवर हे सारे फीचर्स आल्यावर हे ॲप देखील मेटाच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया ॲप्सना तगडी टक्कर देईल.
वाचा : अबब! 200MP कॅमेरा, 1TB स्टोरेज, डिस्प्लेसह डिझाइनही दमदार, Realme 11 सिरीजमधील फोन लाँच

निष्क्रिय खाती लवकरच हटवली जाणार
समोर येणाऱ्या माहितीनुसार ट्विटरवर या आठवड्यात कंपनीने अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेली खाती हटवण्याची आणि प्रक्रिया सुरू केली आहे. या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील अनेक निष्क्रिय खाती काढून टाकल्यास वापरकर्त्यांच्या फॉलोअर्समध्ये घट होऊ शकते, असंही मस्क म्हणाले होते. ट्विटरच्या धोरणानुसार, वापरकर्त्यांनी ३० दिवसांच्या आत त्यांच्या खात्यात किमान एकदा लॉग इन करणे आवश्यक आहे. जेणेकरून ते खाते दीर्घकाळ निष्क्रिय असल्याचे दिसणार नाही आणि खाते हटवले जाणार नाही.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Source link

blue tickelon musktwittertwitter callingtwitter new featurestwitter video callट्विटरट्विटर फीचर्स
Comments (0)
Add Comment