जिओच्या या प्लान्समध्ये ४०जीबीपर्यंत मोफत डेटा दिला जात आहे. दरम्यान वरील फायदे असणारे तीन प्लान्स जिओकडे असून यात २१९ रुपये, ३९९ रुपये आणि ९९९ रुपये असे तीन प्लान्स आहेत. चलातर या रिचार्जेसबद्दल सारंकाही जाणून घेऊ…
जिओ २१९ रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओचा हा २१९ रुपयांचा प्लान १४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ३जीबी डेली डेटाही मिळत आहे. तसंच १०० डेली एसएमएस मिळत असून स्पेशल ऑफरमध्ये २जीबी एक्स्ट्रा डेटाचं वावचर मिळत आहे, ज्याची किंमत २५ रुपये आहे.
जिओ ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओचा हा ३९९ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग आणि ३जीबी डेली डेटाही मिळत आहे. तसंच १०० डेली एसएमएस मिळत आहे. तसंच ६१ रुपयांच्या वावचरसोबत ६जीबी एक्स्ट्रा डेटा मिळत आहे.
जिओ ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओचा हा ९९९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ३जीबी डेली डेटाही मिळत आहे. तसंच १०० डेली एसएमएस मिळत आहे. तसंच २४१ रुपयांमध्ये ४० जीही मोफतचा डेटा अॅड ऑन मिळत आहे.
वाचा : अबब! 200MP कॅमेरा, 1TB स्टोरेज, डिस्प्लेसह डिझाइनही दमदार, Realme 11 सिरीजमधील फोन लाँच