मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा स्वत:च ट्वीट करत केली आहे. ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा करताना संबधित महिलेचे नाव न घेता त्यांनी हे ट्वीट केलं आहे. मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (exec chair & CTO) म्हणून काम पाहतील, असंही त्यांनी म्हटलं.
ट्विटरची नवीन सीईओ एक महिला
तर पायउतार होण्याच्या निर्णयाबद्दल माहिती देताना, एलन मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सापडला आहे. त्यांनी त्या व्यक्तीचे नाव घेतले नसले तरी ट्विटरच्या नवीन सीईओ महिला असतील असे संकेत त्यांनी दिले. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी X/Twitter साठी नवीन CEO नियुक्त केली असून हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. ती ६ आठवड्यांत काम सुरू करेल. मी आता कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (exec chair & CTO) या भूमिकांमध्ये दिसेन.
दरम्यान वॉल स्ट्रीट जर्नलने अहवाल दिला की एलन मस्क यांनी या पदासाठी कॉमकास्ट एनबीसी युनिव्हर्सल कार्यकारी लिंडा याकारिनो यांच्याशी चर्चा केली आहे. याकारिनो यांनी याआधी मस्क यांचे कौतुकही केले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, एलन मस्क यांनी डिसेंबरमध्ये सांगितले की नवीन व्यक्ती सापडताच ते पद सोडतील.
वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो