Apple Watch Series 8 (GPS)
Apple Watch Series 8 लाइफस्टाइलसाठी एक खास बेस्ट गॅझेट आहे. या वॉच द्वारे तुम्ही तुमच्या आईची ईसीजी आणि ब्लड ऑक्सिजन तपासू शकता. या वॉचमध्ये खास फीचर्स दिले आहेत. या वॉचमध्ये वर्कआउट साठी बेस्ट फीचर्स दिले आहेत. Apple Watch Series 8 (GPS) सीरीजची किंमत ४५ हजार ९०० रुपये आहे.
iPhone 14 Plus
iPhone 14 Plus मध्ये ६.५ इंचाचा Super Retina XDR OLED दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1284 x 2778 पिक्सल आणि 19.5:9 आस्पेक्ट रेशियो आहे. हा फोन iOS 16 वर काम करतो. यात हॅक्सा कोर Apple A15 Bionic (5 nm) दिले आहे. तुमचे बजेट जर चांगले असेल तर तुम्ही आयफोन १४ प्लस तुमच्या आईला गिफ्ट करू शकता. या फोनची किंमत ८९ हजार ९०० रुपये आहे.
iPhone 14
iPhone 14 मध्ये ६.१ इंचाचा Super Retina XDR OLED दिले आहे. फोनमध्ये 1170 x 2532 पिक्सल, 19.5:9 आस्पेक्ट रेशियो दिले आहे. फोन मध्ये Apple A15 Bionic (5 nm) दिले आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. अवघ्या ३० मिनिटात ५० टक्के पर्यंत फोन चार्ज होतो. या फोनची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे.
iPad (10th generation)
iPad (10th generation) च्या ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ४४ हजार ९०० रुपये आहे. यावर्षीच्या मदर्स डे निमित्त तुम्ही आपल्या आईला हे गिफ्ट करू शकता. या आयपॅड मध्ये १०.९ इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला आहे. १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर मध्ये १२ मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा दिला आहे.
वाचाः Xiaomi Phone Discount : १०८ मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा, फोनमध्ये एकूण ५ कॅमेरे, किंमत १५००० पेक्षा कमी
HomePod mini
जर तुमच्या आईला संगीत ऐकण्याची आवड असेल तर हे गॅझेट्स बेस्ट ठरू शकते. HomePod mini जबरदस्त साउंड देते. यात सीरीचा सपोर्ट मिळतो. जो व्हाइस सपोर्ट करतो. होमपॉड मिनीमध्ये शानदार टेक्नोलॉजी आणि अडवॉन्स्ड सॉफ्टवेयर दिले आहे. HomePod mini ची किंमत १० हजार ९०० रुपये आहे.
वाचाः Mother’s Day 2023 : ‘मदर्स डे’ निमित्त आईला गिफ्ट करा हे स्वस्तात मस्त स्मार्टफोन