अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेला द केरल स्टोरी सिनेमात महिलांचं केलं जाणारं धर्मांतर आणि त्यांना आएसआय या दहशतवादी संघटनेमध्ये कसं पाठवलं जातं हे दाखवलं आहे. या सिनेमावरून वाद निर्माण झाला असून तो अद्याप शमलेला नाही. परंतु या वादाचा फायदा सिनेमाच्या कलेक्शनवर झाला आहे..बॉक्स ऑफिस इडियानं दिलेल्या रिपोर्टनुसार सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवशी या सिनेमानं ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी १२.२५ कोटी रुपये कमावले आहेत. सिनेमा केरळमधील तीन मुलींच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमाचा विषय आणि त्यातील वातावरण यामुळे या सिनेमाची तुलना द काश्मीर फाईल्सबरोबर होत आहे.
विपुल शाह यांची निर्मिती असलेला या सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली आहे. या बंदीमुळे सिनेमाच्या कमाईवर थोडा परिणाम नक्कीच झाला आहे. ही बंदी घातली नसती तर सिनेमानं ८० कोटींचा टप्पा कधीच पार केला असता. भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री झाला आहे. मुंबई, दिल्ली-एनसीआर, बिहार,उत्तर प्रदेश, गुजरात,आंध्र/निजाम अशा विविध प्रांतामध्ये हा सिनेमा घसघशीत कमाई करत आहे.
द केरल स्टोरी बॉक्स ऑफिस कलेक्शन
- शुक्रवार, पहिला दिवस – ०६.७५ कोटी रुपये
- शनिवार, दुसरा दिवस-१०.५० कोटी रुपये
- रविवार, तिसरा दिवस- १६ कोटी रुपये
- सोमवार, चौथा दिवस- १० कोटी रुपये
- मंगळवार, पाचवा दिवस-११ कोटी रुपये
- बुधवार, सहवा दिवस-११ .७५ कोटी रुपये
- गुरुवार, सातवा दिवस- १२.२५ कोटी रुपये रुपये
पहिल्या आठवड्याची एकूण कमाई- ७८.२५ कोटी रुपये
६० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला सिनेमा
दरम्यान, द केरला स्टोरी सिनेमाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ट्विट करून सांगितलं की सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सात दिवसांत ६० लाख प्रेक्षकांनी सिनेमागृहांत जाऊन सिनेमा पाहिला.
त्यांनी ट्विटवर लिहिलं आहे की, ‘भारतामध्येआतापर्यंत ६०००,००० हून अधिक प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला आहे. गुरुवारी सिनेमाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. द केरल स्टोरी ४० पेक्षा जास्त देशांमध्ये एकाचवेळी प्रदर्शित झाला…’