जीमेल स्वतः लिहिणार मेल
नवीन हेल्प मी राइट फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सला फक्त एक ईमेल टाइप करणे सुरू करावे लागणार आहे. नंतर हेल्प मी राइट बटनवर क्लिक करावे लागेल. एआय तेव्हा ऑटोमेटिक रूपाने ईमेलचा एक ड्राफ्ट तयार करेल. यानंतर यूजर्स आपल्या आवश्यकतेनुसार, बदलू शकतात. तसेच सेंड सुद्धा करू शकतात.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
Google Bard लाँच
गुगलने वार्षिक डेव्हलपर काँन्फ्रेंन्स Google I/O मध्ये आपल्या एआय टूल बार्ड ला सुद्धा भारतात लाँच केले आहे. गुगल बार्डला ओपन आयच्या चॅटजीपीटीला टक्कर देणार आहे. गुगलची कन्वर्सेशन जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेन्स चॅटबॉट सर्विसला भारतासह १८० हून जास्त देशात सुरू केले आहे. बार्डला पहिल्यांदा यावर्षी फेब्रुवारी मध्ये आणले होते.
वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो
गुगलचा पहिला फोल्डेबल फोन
गुगलने आपल्या इव्हेंट मध्ये Google Pixel Fold ला सुद्धा लाँच केले आहे. या इव्हेंट मध्ये Google Pixel Fold सोबत Pixel 7a ला सुद्धा लाँच केले आहे. हा फोन Pixel 6a चा अपग्रेडेड फोन आहे. तर Google Pixel Fold कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आहे.
वाचाः यंदाच्या Mother’s Day 2023 निमित्त आईला करुन द्या वर्षभरासाठीचा रिचार्ज, कोणती कंपनी देतेय बेस्ट डिल?