१० दिवसात बीडीडी चाळ पुनर्वसनाचे काम सुरू होणार; गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा

हायलाइट्स:

  • नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत राहणाऱ्या पात्र नागरिकांना ५०० चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार.
  • पुढील दहा दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरू करण्यात येणार आहे- गृहनिर्माण मंत्री जितेद्र आव्हाड.
  • यासाठी सुमारे ४०० लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिल मधील इमारतींमध्ये करण्यात येणार आहे.

मुंबई: नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. अशा नागरिकांना ५०० चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार असून पुढील दहा दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेद्र आव्हाड यांनी केली आहे. यासाठी सुमारे ४०० लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिल मधील इमारतींमध्ये करण्यात येईल. ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसेल त्यांना शासनातर्फे २२ हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल. या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उर्वरित दोन शासन निर्णय येत्या आठ दिवसात काढण्यात येतील . पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील आठ दिवसात त्याचाही शासन निर्णय काढण्यात येईल असे डॉ.आव्हाड यांनी सांगितले. (bdd chaal rehabilitation work will start in 10 days says housing minister jitendra awhad)

गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी आज नायगाव येथील ललित कला भवन येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. शासन कोणालाही बेघर करणार नाही अशी ग्वाही यावेळी आव्हाड यांनी दिली. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये असे आवाहन डॉ.आव्हाड यांनी यावेळी केले.

क्लिक करा आणि वाचा- ते अनेक महिने कोल्हापुरात बनावट नोटा छापून खपवत होते, आणि मग…

देखभाल दुरुस्तीचा समावेश करारात करणार

इमारतींच्या देखभाल – दुरुस्तीचा समावेश करारात करण्यात येणार आहे तसेच पात्र – अपात्रते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असेही श्री.आव्हाड यांनी स्पष्ट केले.

आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प

बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प असून हे महाराष्ट्राला गौरवास्पद आहे असेही डॉ.आव्हाड यांनी सांगितले. यावेळी डॉ.आव्हाड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशी यांचेशी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संवाद साधला व रहिवाश्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यांनी स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींना शासनास सहकार्याचे आवाहन केले.

क्लिक करा आणि वाचा- करोना: दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात; मात्र, ‘या’मुळे चिंतेत भर

यावेळी सदनिकेच्या प्रतिकृतीची पाहणीही डॉ.आव्हाड यांनी केली. नायगाव बीडीडी चाळीमध्ये ४१ इमारती असून ३ हजार ३४४ सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर व श्री.राजू वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी योगेश म्हसे,स्थानिक नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशी व म्हाडाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- आता एका क्लिकवर मिळवा रेल्वे प्रवासासाठी ‘ई-पास’; राज्य सरकारने प्रसिद्ध केली ‘ही’ लिंक

Source link

bdd chaal rehabilitationHousing Minister Jitendra Awhadwork will start in 10 daysजितेंद्र आव्हाडबीडीडी चाळ पुनर्वसन
Comments (0)
Add Comment