Brodband Plans : जिओ, एअरटेलसह बीएसएनएलचे ब्रॉडबँड प्लान्स, अनलिमिटेड डेटासह कॉलिंगही, किंमत ३२९ पासून सुरु

नवी दिल्ली : Jio, BSNL, Airtel Broadband Plans : आजकालच्या डिजीटल युगात सारंकाही इंटरनेटवर अवलंबून आहे. प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट लागतं… म्हणजे शिक्षणापासून ते नोकरी बऱ्याच गोष्टी आजकाल इंटरनेटवर अवलंबून आहेत. त्यात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आल्याने आता घरोघरी चार्जिंग पॉईंट्सची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान यामुळेच आजकाल अनेकजण घरी ब्रॉडबँड बसवून घेत असतात. तर आता तुम्हीही जर ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला आज ५०० रुपयांच्या आतील जिओ, एअरटेलसह बीएसएनएलचे ब्रॉडबँड प्लान्स सांगणार आहोत.

JioFiber ३९९ रुपयांचा प्लान

जिओचा ब्रॉडबँड प्लान JioFiber नावाने ग्राहकांसाठी घेऊन येत असून याचा स्टार्टींगचा प्लान ३९९ रुपयांचा आहे. यामध्ये 30mbps ची स्पीड आणि तब्बल 3.3TB इतका डेटा महिन्याला मिळतो. यासोबतच मोफत व्हॉईस कॉलिंग देखील यामध्ये मिळत असून जीएसटी पकडून या प्लानची किंमत काहीशी वाढू शकते. याप्लानची व्हॅलिडीटी ३० दिवस इतकी आहे.

Airtel Xstream चा ४९९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा ब्रॉडबँड प्लान Airtel Xstream म्हणून ओळखला जात असून ४९९ रुपयांपासून एअरटेल प्लानची सुरुवात होते. या प्लानमध्ये 40mbps इतकी स्पीड आणि 3.3TB मंथली डेटा मिळतो. या प्लानमध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्स असून यात अपोलो 24/7 सर्कल. विंक म्यूझिक तसंच अनलिमिटेड कॉलिंग या सुविधाही आहेत.

वाचाः अबब! 200MP कॅमेरा, 1TB स्टोरेज, डिस्प्लेसह डिझाइनही दमदार, Realme 11 सिरीजमधील फोन लाँच

BSNL Bharat Fiber चा ३२९ रुपयांचा प्लान
या यादीत बीएसएनएलचा प्लानस सर्वात कमी किंमतीचा म्हणजेच ३२९ रुपये इतरा आहे. याची व्हॅलिडिटीही १ महिना असून यामध्ये 20mbps इतकी स्पीड आणि 1TB डेटा मिळतो. पण हा प्लान काही शहरांतच आणि नव्या कनेक्शनसाठी उपलब्ध आहे. यामध्येही व्हॉईस कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे.

वाचा : Google Pixel 7a कि Pixel 7 कोणता गुगलचा स्मार्टफोन आहे बेस्ट? वाचा प्रत्येक पॉईंटबद्दल सविस्तर

Source link

airtel plansbroadband plansbsnl plansjio plansएअरटेलजिओबीएसएनएलब्रॉडबँड प्लान्स
Comments (0)
Add Comment