आजचे पंचांग आणि दिनविशेष १३ मे २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 May 2023, 4:11 am

Daily Panchang In Marathi: शनिवार १३ मे २०२३, भारतीय सौर २३ वैशाख शके १९४५, वैशाख कृष्ण अष्टमी सकाळी ६-५० पर्यंत, नवमी उत्तररात्री ४-४२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: धनिष्ठा सकाळी ११-३४ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: कृत्तिका,

 

राष्ट्रीय मिती वैशाख २३, शक संवत् १९४५, वैशाख कृष्ण अष्टमी, शनिवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे ३०, शव्वाल-२२, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १३ मे सन २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. अष्टमी तिथी सकाळी ६ वाजून ५१ मिनिटापर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. धनिष्ठा नक्षत्र सकाळी ११ वाजून ३५ मिनिटापर्यंत शतभिषा नक्षत्र प्रारंभ.

ब्रह्म योग सकाळी ९ वाजून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर ऐंद्र योग प्रारंभ. कौलव करण सकाळी ६ वाजून ५१ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल. आज नवमी तिथीचा क्षय.

सूर्योदय:

सकाळी ६-०६,

सूर्यास्त:

सायं. ७-०४,

चंद्रोदय:

उत्तररात्री २-२१,

चंद्रास्त:

दुपारी १-१६,

पूर्ण भरती:

पहाटे ५-४६ पाण्याची उंची ३.१८ मीटर, सायं. ६-५५ पाण्याची उंची ३.८८ मीटर,

पूर्ण ओहोटी:

सकाळी ११-५७ पाण्याची उंची १.४६ मीटर, उत्तररात्री १-३२ पाण्याची उंची १.७८ मीटर.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :

अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ४ मिनिटे ते ७ वाजून २६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी ३ वाजून २८ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून ५ मिनिटे ते ७ वाजून ४९ मिनिटापर्यंत राहील. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय

: शनि मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तिळ अर्पण करा. शनि चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 13 may 2023आजचे पंचांगआजचे पंचांग १३ मे २०२३दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment