अतिगेमिंग धोकादायक
मोबाईल फोन वापरताना अनेकजण बराच वेळ गेमिंग करत असल्याचं अनेकदा दिसून येतं. यामुळे स्मार्टफोनचा परफॉर्मन्सही खूप कमी होतो. म्हणूनच गेमिंग करताना तुम्ही प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घेतली पाहिजे. तसेच, सतत गेमिंग करणे देखील स्मार्टफोनच्या बॅटरीसाठी हानिकारक आहे. यामुळे तुमच्या स्मार्टफोनच्या मदरबोर्डवरही परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला मोठं नुकसा होऊ शकतो.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
चार्जिंग करताना काळजी घ्या
स्मार्टफोनची चार्जिंग ही एक महत्त्वाची गोष्ट असते. दरम्यान या चार्जिंगच्या वेळेवरही तुम्हाला खूप लक्ष द्यावे लागते. सतत चार्जिंग केल्यानेही स्मार्टफोन खराब होऊ शकतो. तसेच, ते दुरुस्त करण्यासाठी लांब जावं लागणार आहे. तसंच स्मार्टफोन चार्ज करताना काळजी घ्यावी लागणार आहे, कारण चार्जिंगची वेळ देखील खूप महत्वाची आहे. ओव्हरचार्जिंग देखील स्मार्टफोनसाठी हानिकारक आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
सतत लेटेस्ट अपडेट करा
अनेक वेळा आपण पाहतो की, स्मार्टफोन सतत वापरूनही अपडेट करत नाही. हे तुमच्या डिव्हाइससाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर तुमचा स्मार्टफोन अपडेटेड असेल तर त्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही चांगले काम करतील. यामुळेच तुम्ही वेळोवेळी फोन अपडेट करत राहावे. असे न करणे तुमच्या फोनसाठी देखील हानिकारक आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
जास्त कनेक्टिव्हिटी टाळणं गरजेचं
आजकाल आपला फोन सतत इंटरनेटशी कनेक्ट असतो, म्हणजे कायम त्याचं इंटरनेट ऑनच असतं. पण अशामध्ये सतत इंटरनेटशी फोन कनेक्ट केल्याने तुमची बॅटरी जलदगतीने संपू शकते ज्यामुळे स्मार्टफोन लवकर खराब होऊ शकतो. तसंच मोबाईल हॉटस्पॉट वापरणे, दीर्घ काळासाठी GPS वापरणे, व्हिडिओ पाहणे, म्युझिक ऐकणे यामुळे तुमची बॅटरी कमी असताना ती आणखीच उतरु शकते. तसंच कॉलिंगमुळेही बॅटरी उतरते. विशेष म्हणजे रोमिंगमध्ये प्रवास करताना जास्त कॉल केले तरी बॅटरी लवकर संपते. त्यामुळे चार्ज कमी असताना सततची
कनेक्टिव्हिटी टाळणं गरजेचं आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
हेवी ॲप्लिकेशनचा वापर टाळा
तर अनेक रिपोर्ट्समधून आणि प्रॅक्टिकलमधून हे समोर आलं आहे की, बॅटरी जास्त काळ वापरण्यासाठी, कमी चार्जमध्ये असताना मोठमोठ्या म्हणजेच हेवी ॲप्लिकेशन्सचा वापर करणं टाळायला हवं. म्हणजेच तुम्ही कॅमेराचा जास्त वापर करू नये किंवा कोणतेही अधिक बॅटरी खाणारे ॲप्लिकेशन्स सतत वापरणे टाळावे. जसंकी सोशल मीडियावर रिल्स पाहणे, मोठ्या ग्राफिक्सचे गेम खेळणे, या साऱ्या गोष्टी करणं टाळावं लागणार आहे
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा