मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर
या सेक्टरमधील लोकांच्या नोकऱ्या AI मुळे सर्वाधिक धोका आहे. या सेक्टरमध्ये मशिन्स सर्वाधिक वापरल्या जातात. ज्यामुळे आधीच मॅनपावरची कामं कमी झाली आहेत. अशामध्ये कस्टमर सर्व्हिससाठी माणसं लागत असताना या AI चॅटबॉटमुळे या नोकऱ्याही धोक्यात आल्याने आणखी जॉब लॉस होऊ शकतो.
ट्रान्सपोर्टेशन
या सेक्टरमध्येही मोठे बदल होऊ शकतात आणि अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. कारण आजकाल सेल्फ ड्राईव्ह करणाऱ्या कार्स आल्याने कितीतरी नोकऱ्या जाऊ शकतात. ड्रोनने डिलेव्हरी होत आहे. या सर्वामुळे ड्रायव्हर आणि डिलेव्हरी बॉयच्या अशा नोकऱ्या धोक्यात येणार आहेत.
हेल्थकेअर सेक्टर
हेल्थकेअर सेक्टरमध्ये देखील AI चा वापर फार वाढला आहे.रेडियोलॉजिस्ट मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्टच्या नोकऱ्या आता धोक्यात आहेत.
जेफ्री हिंटन यांचही AI बद्दल मोठं वक्तव्य
AI विश्वात महत्त्वाची कामगिरी करणारं एक नाव म्हणजे जेफ्री हिंटन. सर्वात आधी त्यांनीच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या प्रणालीवर काम सुरु केलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी गुगलचा राजीनामा दिला आणि त्यावेळी AI बद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. गुगलचा राजीनामा देत त्यांनी AI संबधित एक सूटक ट्वीटही केलं. जेफ्री हिंटन म्हणाले, ”आज न्यूयॉर्क टाईम्सचे रिपोर्टर Cade Metz यांनी लिहिलं की मी Google सोडलं जेणेकरून मी Google वर टीका करू शकेन. पण मूळात मी गुगल सोडलं जेणेकरून मी AI च्या धोक्यांबद्दल बोलू शकेन याचा Google वर कसा परिणाम होतो याचा विचार न करता.” या त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी सूचकपणे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे भविष्यात फार धोके असल्याचंच स्पष्ट केलं आहे.
वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो