नवी दिल्लीः Twitter New CEO: एलन मस्क ने ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो यांच्या नावाची घोषणा केली आहे. याआधी पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ म्हणून काम पाहत होते. जर पराग अग्रवाल यांची तुलना Linda Yaccarino यांच्याशी केली तर त्या पराग अग्रवाल यांच्या तुलनेत कमजोर दिसत आहेत. ट्विटर मीडियावरवरील लोक लिंडाला एलन मस्क यांची रबर स्टँम्प म्हणून पाहत आहेत. याच कारणामुळे लिंडाला एलन मस्क सोबत पॉवर शेअर करावे लागत आहे. याआधी पराग अग्रवाल यांच्याकडे ट्विटरचा संपूर्ण कंट्रोल होता. परंतु, लिंडा ट्विटरच्या सीईओ म्हणून बिझनेस ऑपरेशनवर काम करणार आहे. तर एलन मस्क ट्विटर प्रोडक्ट डिझाइन आणि टेक्नोलॉजीवर लक्ष केंद्रीत करणार आहेत.
कोण आहे लिंडा
लिंक्डइन प्रोफाइलच्या माहितीनुसार, ट्विटर सीईओ बनण्याआधी लिंडा एनबीसी यूनिव्हर्सलमध्ये ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशीप चेअरमॅन म्हणून काम करत होत्या. या ठिकाणी त्यांनी २०११ पासून काम केले आहे. लिंडा पेन स्टेट यूनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. त्यांनी कम्यूनिकेशन आणि लिबरल आर्ट्समधून शिक्षण घेतले आहे.

वाचाः Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान
ट्विटरवर नाही अॅक्टिव्ह
लिंडाच्या ट्विटर प्रोफाइलनुसार, त्या ट्विटरवर जास्त अॅक्टिव्ह नाहीत. ट्विटर सीईओ बनण्याआधी लिंडाचे फक्त ७ हजार फॉलोअर्स होते. परंतु, सीईओ बनल्यानंतर लिंडाच्या फॉलोअर्सची संख्या वाढून २ लाखांहून जास्त झाली आहे. लिंडाकडून ट्विटर वर जास्त पोस्ट सुद्धा करण्यात आल्या नाहीत. सीईओ बनल्यानंतर त्या जास्त अॅक्टिव्ह होतील, अशी शक्यता आहे. पराग अग्रवालचे ट्विटर वर ६०९ हजार फॉलोअर्स होते. तर एलन मस्क यांचे एकूण फॉलोअर १३९.४ मिलियन आहेत.
वाचाः Oppo स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी, तुमचा जुना फोनही होणार एकदम नवा, लेटेस्ट अपडेट मार्केटमध्ये