सध्या तरी ही सुविधा केवळ अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये जोडत आहेत. Xiaomi, Samsung, Vivo, Oppo आणि Realme सारख्या कंपन्या आता ‘ड्युअल ॲप्स ‘ किंवा ‘ड्युअल मोड’ फीचर ऑफर करतात, जे वापरकर्त्यांना एकाच चॅट ॲप्सची दोन वेगवेगळी खाती वापरण्याची परवानगी देतात.
काय आहे फीचर?
Xiaomi, Samsung, Vivo Oppo आणि Realme सारख्या कंपन्या हे फीचर इन-बिल्ट स्मार्टफोनमध्ये देत आहेत. म्हणजेच, यासाठी तुम्हाला आता कोणत्याही थर्ड पार्टी ॲप;r गरज नाही. मात्र, ड्युअल मोड फीचर वेगवेगळ्या कंपनीच्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावाने वापरता येते. सॅमसंगमधील ड्युअल मेसेंजर, शाओमीचे ड्युअल ॲप्स , ओप्पो फोनमध्ये क्लोन ॲप्स आणि विवोमधील ॲप्स क्लोन या नावाने हे फीचर उपलब्ध आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
एका फोनमध्ये दोन व्हॉट्सॲप अकाउंट कसे वापराल?
- तुमच्या स्मार्टफोनवरील Settings मधून Dual Apps Settings पर्याय उघडा.
- आता कोणतेही सोशल मीडिया ॲपदोन खाती तयार करायची आहेत.
- जर तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये दोन अकाउंट बनवायचे असतील तर व्हॉट्सॲप निवडा. त्यानंतर काही परमिशन्स देऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.
- आता होम स्क्रीनवर जा आणि तुमच्या ॲपलाँचरमध्ये दिसणार्या दुसऱ्या whatsapp लोगोवर टॅप करा
- दुसरा फोन नंबर वापरून लॉग इन कम्प्लिट करा.
- आता तुम्हाला एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सॲप वापरता येणार आहेत.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?