बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने शुक्रवारी ११.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि नवव्या दिवशी शनिवारी या सिनेमाने १२.५० कोटी रुपयांची कमाई केली. अदा शर्माच्या या सिनेमाने ९ दिवसांत एकूण १०१.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. विपुल शाह यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या ‘द केरला स्टोरी’साठी ही कमाई खूप मोठी आहे.
नवे चित्रपट झाले नापास
गेल्या शुक्रवारी विद्युत जामवालचा IB 71, साउथ स्टार बेल्लमकोंडा श्रीनिवासनचा ‘छत्रपती’ आणि शर्मन जोशीचा ‘म्युझिक स्कूल’ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पण ‘द केरला स्टोरी’च्या झंझावातात हे तिन्ही चित्रपट खूपच मागे पडले आहेय प्रेक्षक अजूनही थिएटरमध्ये The Kerala Story पाहण्यात रस दाखवत आहेत. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ‘द केरला स्टोरी’च्या कमाईत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या कारणामुळे होतंय नुकसान
सुदिप्तो सेनच्या या सिनेमावरुन वाद आणि राजकारण दोन्ही सुरू आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या चित्रपटावर बंदी घातली असून प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी येत नसल्याचा दावा करत तामिळनाडू चित्रपटगृहांमध्ये अनेक शो बंद केले गेले. यामुळे या दोन राज्यात सिनेमाची अजिबात कमाई झाली नाही. जर याठिकाणी सिनेमा दाखवण्यात आला असता तर अंदाजे दररोज ७५ लाखाचा आणखी फायदा झाला असता.
१५० क्लबमध्ये जाणार The Kerala Story
हा सिनेमा ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता येत्या आठवड्यातच तो १५० कोटींचा टप्पा गाठेल यात शंका नाही. ‘द केरला स्टोरी’ प्रमाणेच गेल्या वर्षी विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमानेही धुमाकुळ घातला होता. या सिनमाने एकूण २४६ कोटींची कमाई केली. आता केरला स्टोरी या कमाईलाही मागे टाकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.