Motorola कंपनीने आपला नवा-कोरा स्मार्टफोन Motorola Edge 40 लवकरच लाँच करणार असल्याची माहिती दिली आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार हा एक मिड-बजेट स्मार्टफोन असेल. या किंमतीमध्ये, Realme आणि Xiaomi चे दमदार फोन येत असून यांनाच तगडी टक्कर देण्यासाठी मोटोरोला Motorola Edge 40 घेऊन येत आहे.
या आगामी स्मार्टफोनचे अधिकचे फीचर्स आणि इतर माहिती पाहूया.. हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह लाँच केला जाऊ शकतो. Motorola Edge 40 या स्मार्टफोनच्या किंमतीचा विचार केला तर हा फोन जवळपास ३०,००० रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Ellipse Black, Nebula Green आणि Lunar Blue कलर पर्यायांमध्ये समोर आणला जाऊ शकतो.
फोनच्या फीचर्सचं काय?
जर फोनच्या डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर, लीक झालेल्या रिपोर्ट नुसार, Motorola Edge 40 मध्ये ६.५५ इंचाचा Full HD + डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 1080×2400 पिक्सल रिझोल्युशनसह येईल. फोनचा डिस्प्ले 144HZ रिफ्रेश रेट सपोर्टसह येऊ शकतो. फोनमध्ये 1200 निट्सची पीक ब्राइटनेस असू शकते. त्यामुळे अगदी कडक सूर्यप्रकाशात देखील फोनचा डिस्प्ले चांगलं काम करेल. प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर Motorola Edge 40 स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 8020 चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा फोन 6GB आणि 8GB रॅम वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. 256GB इंटरनल स्टोरेज सपोर्ट फोनमध्ये असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा आणि बॅटरीचं काय?
Motorola Edge 40 स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP चा असेल. तर 13MP अल्ट्रा वाइड अँगल सपोर्ट सेकंडरी कॅमेरा म्हणून दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. हा फोन डॉल्बी एटमॉस स्टीरिओ स्पीकरसह येईल. पॉवरसाठी, Motorola Edge 40 स्मार्टफोनमध्ये 4600mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये 68W टर्बोफास्ट चार्जिंग दिले जाऊ शकते.
वाचा : दमदार बॅटरीचा फोन हवाय? सॅमसंगच्या ‘या’ ३ स्मार्टफोन्समध्ये आहे 6000mAh बॅटरी, किंमत १५,००० पेक्षा कमी