फोनची किंमत आणि ऑफर्स
Realme C33 स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या ऑप्शनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर फ्लिपकार्टवर या फोनला २३ टक्के डिस्काउंट नंतर ९ हजार ९९९ रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. फोनच्या खरेदी वर ८ हजार ९०० रुपये किंमतीची एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. या फोनची किंमत १ हजार ९९९ रुपये राहते. तर ७०० रुपयाचा स्पेशल डिस्काउंट सुद्धा दिला जात आहे. यानंतर फोनची किंमत ३९९ रुपये राहते.
वाचाः ‘या’ आठवड्यात लाँच झाले हे स्मार्टफोन, पाहा फोनची संपूर्ण लिस्ट, किंमत आणि फीचर्स
फोनला HDFC क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यानंतर १ हजार रुपयाची सूट दिली जात आहे. Realme C33 स्मार्टफोनला ४९० रुपये मंथली ईएमआय ऑप्शन सोबत सुद्धा खरेदी करू शकता. फोनच्या खरेदी वर एक वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. या फोनच्या खरेदीवर ७ दिवसाची रिप्लेसमेंट पॉलिसी दिली जात आहे. याचाच अर्थ जर फोन तुम्हाला पसंत पडला नाही तर तुम्ही ७ दिवसाच्या आत तो परत करू शकता.
वाचाः फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल
फोनची स्पेसिफिकेशन्स
Realme C33 मध्ये एक टीबीचे एक्सपँडेबल स्टोरेज दिले आहे. यात ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. तसेच एक ०.३ मेगापिक्सलचा व्हीजीएम कॅमेरा दिला आहे. फ्रंट मध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये Unisoc T612 Processor सपोर्ट दिले आहे.
वाचाः IRCTC ची नवीन स्कीम, रेल्वेचे तिकीट आता काढा, पैसे नंतर भरा