iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max मध्ये मिळणार आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले

iPhone 15 मध्ये काय मिळेल, याची उत्सूकता आयफोन चाहत्यांना लागली आहे. फोनमध्ये कोणती नवीन टेक्नोलॉजी असेल, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. आतापर्यंत आयफोन १५ वरून अनेक लीक्स समोर आल्या आहेत. परंतु, अजूनही स्पष्ट नाही की फोनमध्ये नक्की काय मिळेल. आयफोन १५ सोबत आता आयफोन १६ ची सुद्धा माहिती समोर येत आहे. हा फोन पुढीलवर्षी लाँच होणार आहे. परंतु, असाच एक रिपोर्ट समोर आला आहे. iPhone 16 सीरीज संबंधी अनेक अपडेट्स समोर आले आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

MacRumors च्या रिपोर्टनुसार, अॅपलचे एनालिस्ट Ross Young ने हा दावा केला आहे. पुढील वर्षी कंपनी मोठ्या फोन्सला घेऊन येऊ शकते. कंपनी हळूहळू २०११ नंतर आपल्या फोनची साइज वाढवत आहे. iPhone 4S मध्ये ३.५ इंचाचा डिस्प्ले दिला होता. आज iPhone 14 Pro Max चा डिस्प्ले ६.७ इंचाचा आहे. दोन्ही डिस्प्ले साइज मध्ये मोठा फरक आहे.

Young चा दावा आहे की, अॅपल पुढील वर्षी मोठ्या स्क्रीन साइजचा फोन घेऊन येऊ शकते. यात iPhone 16 Pro 6.3-इंच आणि iPhone 16 Pro Max ६.९ इंचा सोबत येऊ शकते. तर स्टँडर्ड मॉडल्सची स्क्रीन साइज आधीप्रमाणे राहणार आहे. याच्या फायनल स्पेसिफिकेशन्स २३ मे रोजी लॉस एंजेलेसच्या डिस्प्ले विक काँन्फ्रेन्स मध्ये रिवील केले जाऊ शकते.

वाचाः ‘या’ आठवड्यात लाँच झाले हे स्मार्टफोन, पाहा फोनची संपूर्ण लिस्ट, किंमत आणि फीचर्स

iPhone 16: अॅपल १६ प्रो आणि १६ प्रो मॅक्स मॉडल्समध्ये सॉलिड बटन्स हटवणार नाही, असे होऊ शकते. याशिवाय, आधी आलेल्या एका रिपोर्टनुसार, आगामी काळात iPhone 16 Pro Max फास्ट प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेरा इम्प्रूव्मेंट्स सोबत येऊ शकतो. अल्ट्रा फोन बाकीच्या फोनपेक्षा वेगळा असू शकतो. रिपोर्टमधून ही सुद्धा माहिती आली की, iPhone 16 Ultra सोबत यूएसबी टाइप सी पोर्ट असू शकते. कंपनी यूएसबी टाइप सी पोर्ट उपलब्ध करू शकणार नाही, असेही होवू शकते. Apple Watch Ultra प्रमाणे iPhone 16 Ultra सुद्धा अॅपलचा सर्वात हाय एन्ड आयफोन होऊ शकतो. ज्यात सर्वात बेस्ट फीचर्स मिळतील. याची किंमत त्यानुसार असेल.

वाचाः Earbuds पेक्षाही स्वस्त मिळतोय रियलमीचा हा फोन, असा करा ऑनलाइन ऑर्डर

Source link

iPhone 16 ProiPhone 16 Pro detailsiPhone 16 Pro displayiPhone 16 Pro MaxMacRumorsRoss Young
Comments (0)
Add Comment