Oppo F23 5G ची किंमत
फोनला भारतात बोल्ड गोल्ड आणि कूल ब्लॅक शेड्स मध्ये आणले आहे. फोनला सिंगल स्टोरेज मध्ये आणले आहे. फोनच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला कंपनीने वेबसाइट आणि अमेझॉनवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला १८ मे पासून खरेदी करता येणार आहे. ओप्पो ICICI आणि HDFC बँक कार्डद्वारे खरेदी वर फ्लॅट २५०० रुपयाची सूट देत आहे. फोन सोबत एक्सचेंज ऑफर दिली जात असून २३ हजार ७४८ रुपयाची सूट दिली जात आहे. २ हजार रुपयाची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच कंपनी नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देत आहे.
वाचाः ‘या’ आठवड्यात लाँच झाले हे स्मार्टफोन, पाहा फोनची संपूर्ण लिस्ट, किंमत आणि फीचर्स
Oppo F23 5G ची स्पेसिफिकेशन
फोनला भारतात ड्युअल सिम सपोर्ट सोबत आणले आहे. फोनमध्ये ६.७२ इंचाचा फुल एचडी प्लस एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. जो 20 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि (1,080×2,400 पिक्सल) रिजॉल्यूशन सोबत येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर दिले आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ऑटोफोकसचा ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सलचा मोनो सेन्सर, तिसरा २ मेगापिक्सलचा मोनो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
वाचाः जिओपेक्षाही स्वस्त आहे एअरटेलचा हा प्लान, कमी किंमतीत वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग-डेटा