भारत पाक बॉर्डरचा राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न

मुंबई :दि. ०५ :-  भारत पाकचा राजा साकारतोय मुंबई येथील कुर्ला मार्गावरील एल.बी. एस. मार्गावरील श्री सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत
भारत पाक सीमेवर पुछं येथील पुलस्व नदीच्या तटावर मानव अधिकार कार्यकर्त्या ईश्वर दिदी प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट, समाजसेवक छत्रपती आवटे तसेच शिवनेरी सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात विराजमान होणार्या गणेशाला भारत पाक बोर्डरचा राजा म्हणून संबोधले जाते
या गणेशाची मूर्ती दरवर्षी मुंबईतून बनवुन काश्मीरला नेली जाते. हे या मूर्तीचे आठवे वर्ष आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील पुछं जिल्ह्यात विराजमान होणार्या राजाचा पाद्यपूजन सोहळा दिनांक ०२/०८/२०१९ रोजी मोठ्या थाटात माटात संपन्न झाला. त्यावेळी विविध सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, राजकीय,समाजसेवक यांची उपस्थिती होते
या वर्षी साडे पाच फुटाची सुबक हिरेजडीत मूर्ती साकारण्याचे काम मूर्तीकार विक्रांत पांढरे हे आपल्या लाल बहादूर शास्त्री मार्ग कुर्ला येथील श्री सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत साकारत आहे.
कुत्र्याचं शेपूट वाकडंच…! असा वाक्प्रचार आपल्याकडे आहे, त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे भारताशी असलेले सबंध. भारताने उभय देशांतील संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न कितीही केला तरीही पाकिस्तान वाकडेपणातच शिरण्याचा प्रयत्न करतो. युद्ध काळ असो की शांतता काळ, सत्तेवर कोणीही येवो, पाकिस्तानच्या धोरणात काहीही फरक पडत नाही.
सतत कुठल्या ना कुठल्या कुरघोडी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असते. मग बॉम्ब हल्ले असो किंवा कारगिल युद्ध काही दिवसापूर्वी झालेला पुलवामा हल्ला असो. सीमेवर सतत होणारी फायरिंग असो हे आता कुठे तरी थांबणे आवश्यक आहे म्हणून या वर्षी येणार्या गणेशोत्सवात गणरायाला आम्ही साकडे घालणार आहोत. आमच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना उंदड आयुष्य दे आणि सीमेवरील तणाव दूर होऊ दे. असे मत ईश्वर दिदी, छत्रपती आवटे आणि त्याचे सहकारी यांनी व्यक्त केले.

बाळू राऊत प्रतिनिधी

Comments (0)
Add Comment