नोकियाच्या फोनची किंमत
नोकियाच्या या फोनच्या २ जीबी रॅम प्लस ६४ जीबी फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. नोकियाच्या या फोनला चारकोल, पर्पल आणि सँड कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
वाचाः २१९ रुपयाच्या जिओच्या प्लानचा धुमाकूळ, डेली ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
फोनची फीचर्स
नोकियाच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. फोन मध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर दिले आहे. जे एक ऑक्टाकोर प्रोसेसर सोबत येते. यात ४ जीबी रॅम पर्यंत रॅम आणि अँड्रॉयड १३ चे गो एडिशन व ६४ जीबीचे स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी लेन्स १३ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा लेन्स २ मेगापिक्सलचा आहे. फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 10W ची चार्जिंगची बॅटरी दिली आहे. तीन दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअपचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यात बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा दिले आहे. फोनमध्ये फेस अनलॉक दिले आहे.
वाचाः २१९ रुपयाच्या जिओच्या प्लानचा धुमाकूळ, डेली ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग