दरम्यान या ११ दिवसात ‘द केरला स्टोरी’ने सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने अशीच कमाई सुरू ठेवल्यास The Kerala Story २०० कोटींचा आकडाही गाठेल, अशी शक्यता आहे. जाणून घ्या ‘द केरला स्टोरी’ने दुसऱ्या सोमवारी म्हणजेच ११ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली.
The Kerala Story Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ‘द केरला स्टोरी’ने, रविवारी २३.२५ कोटींची कमाई केली, तर सोमवारी या कमाईत काहीशी घट झाली. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ने ११ व्या दिवशी ०९.५ कोटी रुपये कमावले आहेत. या कमाईनंतर देशभरातील द केरला स्टोरीचे एकूण कलेक्शन १४१.३६ कोटी इतके झाले आहे. रविवारी २३ कोटींहून अधिक कमाई झाली, मात्र सोमवार वर्किंग डे असल्याने या कमाईत ५० ते ६० टक्क्यांची घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता संपूर्ण आठवड्यात सिनेमा किती कमाई करेल आणि २०० कोटींचा टप्पा गाठेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अलीकडेच या सिनेमाच्या कमाईबाबत दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची प्रतिक्रिया समोर आली होती. त्यांनी असे म्हटलेले की, त्यांनी १०० कोटींची फक्त कमाई केली नाहीये, तर कोट्यवधी लोकांची मन जिंकली आहेत.
या गोष्टीमुळे होतंय नुकसान
बंगालमध्ये बंदीमुळे ‘द केरला स्टोरी’ला फटका बसला आहे, तर तामिळनाडूमध्येही कमी प्रेक्षकसंख्येचा दावा करत शो रद्द झालेत. शिवाय या सिनेमाचे शो ब्रिटनमधून रद्द केल्याचेही समोर आले होते. यामुळे काही प्रमाणात बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होत असला तरी बड्या शहरांमध्ये सिनेमा चांगली कमाई करत आहे.