हायलाइट्स:
- डेल्टा प्लस व्हेरिएंटचे महाराष्ट्रात रुग्ण
- मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यू
- लागण नेमकी कशी झाली?
अकोलाः राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळं चिंता वाढली आहे. राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, ठाणेनंतर अकोला जिल्ह्यातही करोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २० रुग्ण बुधवारी आढळले होते. तर, डेल्टा विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अकोला जिल्ह्यातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यात एकीकडे करोना संसर्गाचे संक्रमण कमी होत चालले असताना जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण अकोट येथील रहिवाशी असून २९ जून रोजी त्याला उपचारांसाठी अकोल्यातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. संबंधित रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरा झाला आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
धोका वाढला! मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी; लसचे दोन्ही डोस घेऊनही
हा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभागाचे एक पथक तातडीने अकोटकडे रवाना करण्यात आले असून संबंधित रुग्ण सध्या बरा झाला असला तरी त्याच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे नमुने या आरोग्य पथकाद्वारे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती समजतेय.
दरम्यान, मुंबईत करोना लसीचे दोन डोस घेऊनही डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरडा खोकला, अंगदुखीचा त्रास या महिलेला होत होता. तोंडाची चवही गेली होती. त्यानंतर कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
ग्रामीण भागांतील संसर्गानं वाढवली चिंता; हा तिढा सुटणार कसा?
डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे?
डेल्टा प्लस व्हेरिएंट हे करोना विषाणूचे बदललेले रूप आहे. हे रुप राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतात करोनाची दुसरी लाट निर्माण होण्याचे डेल्टा प्लस व्हेरिएंट हेच कारण होते. हा डेल्टा सर्वप्रथम भारतात आढळला होता. हा डेल्टा B1.617.2 हे म्यूटेशन आहे.