पहिल्यापेक्षा आता जास्त रुपये द्यावे लागणार
WhatsApp बिझनेसच्या प्रत्येक कन्वर्सेशनसाठी सध्या ०.४८ रुपये चार्ज केले जाते. परंतु, १ जून २०२३ पासून या चार्ज मध्ये बदल करण्यात येणार आहे. नवीन गाइडलाइन अंतर्गत १ जून २०२३ पासून यूटिलिटी मेसेजसाटी ०.३०८२ रुपये प्रति कन्वर्सेशनच्या हिशोबानुसार चार्ज आकारला जाणार आहे. तर मार्केटिंग मेसेजसाठी ०.७२६५ रुपये प्रति कन्वर्सेशन चार्ज केला जाणार आहे. प्रत्येक मेसेजसाटी ऑथेंटिकेशनच्या किंमतीची घोषणा नंतर केली जाणार आहे.
यूटिलिटी आणि ऑथेंटिकेशनसाठी द्यावी लागतील पैसे
यूटिलिटी मेसेज ग्राहकांना ऑनगोइंग देवाण घेवाण खरेदीदारीनंतर नोटिफिकेशन आणि बिलिंग स्टेटमेंटची माहिती देते. तर ऑथेंटिकेशन मेसेज बिझनेसला वनटाइम पासकोडने ऑथेंटिकेट करण्याची परवानगी देते. तर जो कन्वर्सेशन यूटिलिटी आणि ऑथेटिकेशन कॅटेगरीत जाणार नाही. त्यांना प्रमोशनल कन्वर्सेशन कॅटेगरीत समावेश केला जाईल. मार्केटिंग कन्वर्सेशन मध्ये प्रमोशनल आणि ऑफर्स शिवाय, इन्फॉर्मेशन रिलेटेड अपडेट इव्हाइट मिळते.
वाचाः Nokia ने भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, कमी किंमतीत बेस्ट फीचर्स
काय आहे WhatsApp Business
WhatsApp Business अकाउंट नॉर्मल अकाउंट पेक्षा वेगळे आहे. बिझनेस अकाउंटमध्ये प्रमोशन आणि मार्केटिंगचा ऑप्शन मिळतो. प्रमोशन मेसेजमधून तुम्ही दुसऱ्याच्या स्टोरीत तुम्ही तुमची प्रमोशनल स्टोरी जोडू शकता. परंतु, यासाठी चार्ज द्यावा लागतो. तर नॉर्मल WhatsApp अकाउंट हे पूर्णपणे फ्री असते.
वाचाः आता काय होणार! २०० फुटाचा भलामोठा लघूग्रह आज येणार पृथ्वीच्या दिशेने, Nasa कडून अलर्ट जारी