Lava Agni 2 5G भारतात लाँच, शानदार डिस्प्ले, प्रोसेसर आणि कॅमेरा जबरदस्त

Lava Agni 2 5G Launched In India : भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा ने आपल्या अग्नी सीरीजचा नवीन फोन Lava Agni 2 5G ला भारतात लाँच केले आहे. या फोनला ६.७८ इंचाचा अमोलेड कर्व्ड डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. डिस्प्ले सोबत १२० हर्ट्जचा रिफ्रेश रेट मिळतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आणि १६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. फोन ५जी कनेक्टिविटी सोबत येतो. यात 13 5G बँडचा सपोर्ट आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरा सपोर्ट दिला आहे. जाणून घ्या फोनची किंमत व फीचर्ससंबंधी.

Lava Agni 2 5G ची किंमत
लावा अग्नी २ ५जीची किंमत २१ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. फोन सोबत कंपनी सर्व प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डवर २ हजार रुपयाचा फ्लॅट सूट देत आहे. फोनला २४ मे पासून अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे.

फोनची स्पेसिफिकेशन
लावाच्या या नवीन फोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि 1.07 बिलियन कलर डेप्थ सोबत येतो. डिस्प्ले सोबत एचडीआर, एचडीआर १० आणि एचडीआर १० प्लस आणि वाइडलाइन एल १ चा सपोर्ट मिळतो. लावाचा हा फोन भारतातील पहिला फोन आहे. जो MediaTek Dimensity 7050 सोबत येतो. फोनमध्ये ८ जीबी रॅमचा सपोर्ट दिला आहे. रॅमला व्हर्च्युअली १६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

वाचाः आता काय होणार! २०० फुटाचा भलामोठा लघूग्रह आज येणार पृथ्वीच्या दिशेने, Nasa कडून अलर्ट जारी

फोनमध्ये २५६ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. या फोन सोबत तीन वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट आणि दोन वर्षाचा अँड्रॉयड अपडेट कंपनी देणार आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 4700 एमएएचची बॅटरी आणि 66W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

वाचाः WhatsApp मध्ये जूनपासून होणार अनेक बदल, या यूजर्सला द्यावे लागतील पैसे

Source link

lava agni 2 5glava agni 2 5g featurelava agni 2 5g pricelava agni 2 5g price in indialava agni 2 5g specificationलावा अग्नी २ ५जी फोन
Comments (0)
Add Comment