आजचे पंचांग आणि दिनविशेष १७ मे २०२३ : प्रदोष, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 May 2023, 4:11 am

Daily Panchang In Marathi: बुधवार १७ मे २०२३, भारतीय सौर २७ वैशाख शके १९४५, वैशाख कृष्ण त्रयोदशी रात्री १०-२८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रेवती सकाळी ७-३८ पर्यंत, चंद्रराशी: मीन सकाळी ७-३८ पर्यंत, सूर्यनक्षत्र: कृत्तिका,

 

राष्ट्रीय मिती वैशाख २७, शक संवत १९४५, वैशाख कृष्ण त्रयोदशी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे ३, शव्वाल-२६, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १७ मे २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. त्रयोदशी तिथी रात्री १० वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. रेवती नक्षत्र सकाळी ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ.

आयुष्मान योग रात्री ९ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ. गर करण सकाळी ११ वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र सकाळी ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत मीन राशीत त्यानंतर मेष राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-०५,

सूर्यास्त:

सायं. ७-०५,

चंद्रोदय :

पहाटे ४-१५,

चंद्रास्त:

सायं. ५-०४,

पूर्ण भरती:

सकाळी १०-३६ पाण्याची उंची ४.२९ मीटर, रात्री १०-३३ पाण्याची उंची ४.०८ मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे ४-०८ पाण्याची उंची ०.७३ मीटर, सायं. ४-२० पाण्याची उंची १.५५ मीटर.

दिनविशेष:

प्रदोष, शिवरात्री.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :

ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटे ते ५ वाजून २० मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ५ मिनिटे ते ७ वाजून २७ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १२ वाजून १५ मिनिटे ते १ वाजून ५० मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत राहील. भद्रा काळ रात्री १० वाजून २८ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३ मिनिटापर्यंत. पंचक काळ सकाळी ६ वाजून ३ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय:

भगवान शंकराती पूजा आणि अभिषेक करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathipradosh vratshubh muhurta and shubh yogtoday panchang 17 may 2023आजचे पंचांगआजचे पंचांग १७ मे २०२३दिनविशेषप्रदोषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment