तरीही ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या मागेच
मात्र, दुसरीकडे ‘द केरला स्टोरी’च्या १२ व्या दिवसाच्या कमाईची तुलना ‘द कश्मीर फाइल्स’शी केली तर अदा शर्माचा चित्रपट अजूनही मागे आहे. मात्र, चित्रपटाच्या कमाईचा वाढता वेग ‘द कश्मीर फाईल्स’ सारखाच आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ने 12 व्या दिवशी १०.२५ कोटींची कमाई केली होती. विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटापेक्षा ‘द केरला स्टोरी’ फक्त ४५ लाख रुपये मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, ‘द कश्मीर फाइल्स’ने १२ दिवसांत देशात सुमारे १७९.८५ कोटी रुपयांची कमाई केली, यातही ‘द केरला फाइल्स’ अजूनही २९.१९ कोटी रुपयांनी मागे आहे.
तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस २०० कोटींच्या जवळपास पोहोचू शकतो
१२ व्या दिवशी ‘द केरला स्टोरी’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर सकाळच्या शोमध्ये ११.५० टक्के, दुपारच्या शोमध्ये १९.०७ टक्के आणि संध्याकाळच्या शोमध्ये १८.९४ टक्के इतकी कमाई झाली आहे. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस हा चित्रपट २०० कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.
ब्रेनवॉशनंतर धर्मांतराचा खेळ
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात दावा करण्यात आला आहे की, ही केरळमधील मुलींची सत्यकथा आहे ज्यांचे आधी ब्रेनवॉश करण्यात आले आणि नंतर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगण्यात आले. यानंतर त्या मुलींची फसवणूक करून त्यांना इराक-सीरिया सीमेवर पाठवले जाते. तेथे ते आयएसआयएसच्या तावडीत अडकतात, जिथे त्यांचा एकतर लैंगिक गुलाम म्हणून वापर केला जातो किंवा त्यांना मानवी बॉम्बर बनवून मृत्यूच्या खाईत ढकलले जाते.
असिफा वसतिगृहात येणाऱ्या मुलींची शिकार करते
विपुल शाह निर्मित या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात सोनियाने असिफाची भूमिका साकारली आहे, जी वसतिगृहात येणाऱ्या मुलींची शिकार करते आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडते.