अलर्ट! भारतावर चीनचा सायबर हल्ला, घरातील Wi-Fi राउटरची अशी घ्या काळजी

WI-FI Cyber Fraud: घरात वाय फाय राउटर लावलेले असते. त्याकडे महिनो महिने कुणाची नजर जात नाही. परंतु, चिनी हॅकर्सने आता या राउटरला लक्ष्य करीत भारतावर सायबर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. खरं म्हणजे सीमेवरून भारत आणि चीन यांच्यातील संबंधी बिघडले आहेत. चीन सरकारचा पाठींबा असलेल्या एका हॅकर्सने भारतीय लोकांना नुकसान पोहोचण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. चायनीज हॅकर्सने वाय फाय राउटर्सला लक्ष्य केले आहे. जाणून घ्या यासंबंधीची सविस्तर माहिती.

TP-Link राउटरला सर्वात जास्त धोका
चायनीज TP-Link राउटरमध्ये धोकादायक Firmware ला इंम्प्लाट करीत आहे. हे Firmware मेलवेयर डिव्हाइसचा फुल कंट्रोल मिळवते. यानंतर हॅकिंगच्या घटना घडवली जाते. चेक प्वॉइंट रिसर्च रिपोर्टनुसार, चीनच्या स्टेट स्पांसर्ड सायबरकडून हा हल्ला करण्यात आला आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हॅकर्स राउटरची कमी शोधून त्यात सहज पासवर्डने लक्ष करीत आहेत.

वाचाः Window AC च्या किंमतीत Split AC, अर्ध्या किंमतीत घरी घेऊन जाण्याची संधी

अन्य डिव्हाइसलाही हॅकिंगचा धोका
चेक प्वॉइंट रिसर्च नुसार, फक्त टीपी लिंक राउटर नाही तर अन्य डिव्हाइस मध्ये सुद्धा हॅकिंगची घटना घडवली जात आहे. रिपोर्ट मध्ये म्हटले की, लोकांनी आता आपल्या नेटवर्क डिव्हाइसला नियमित अपडेट करण्याची गरज आहे. तरच या धोक्यापासून सुरक्षित राहता येईल.

वाचाः नवीन रेल्वे ॲप लाँच, कन्फर्म तिकिटासोबत मिळेल Netflix ची मजा

कसा कराल बचाव
सॉफ्टवेयर अपडेट
यूजर्सला नेहमी वेळोवेळी राउटरचे सॉफ्टवेयर अपडेट करणे गरजेचे आहे. यामुळे राउटर अपकमिंग सायबर हल्ल्यासाठी तयार राहिल.

वाचाः महिन्याला फक्त ९९ रुपये खर्च करा, अन् मिळवा ३ जीबी डेटा, SMS आणि व्हाइस कॉलिंग

डिफॉल्ट क्रिडेंशियल
यूजर्सला डिफॉल्ट लॉगिन क्रिडेंशियलमध्ये बदल करायला हवा. तसेच डिव्हाइसला वाय फाय कनेक्ट करून मजबूत पासवर्ड ठेवावा.

वाचाः २८ हजार किमी प्रति तास वेगाने ३ मोठे दगड पृथ्वीच्या दिशेने येताहेत, काय होईल?

Online Shopping करते समय हो सकते हैं Fraud का शिकार!

Source link

cyber fraudcyber fraud alertcyber fraud casescyber fraud newsWI-FI Cyber Fraudसायबर हल्ला
Comments (0)
Add Comment