मंगळ ग्रहाच्या दुसऱ्या सर्वात उंच ज्वालामुखीचा फोटो आला समोर, याच्या उंचीपुढं एव्हरेस्टही ठेंगणे

अमेरिकेची अंतराळ एजन्सी Nasa सह जगभरातील स्पेस एजन्सी मंगळ ग्रहासंबंधित अपडेट देत आहेत. मंगळ ग्रहावर पाठवलेले जास्तीत जास्त स्पेस मिशनचा उद्देश हा तेथील जीवनाच्या शक्यतेची पडताळणी करणे हा आहे. या यादीत आता यूरोपची स्पेस एजन्सी (ESA) ने मंगळ ग्रहाच्या एका ज्वालामुखी (Volcano on Mars) चा फोटो घेतला आहे. याचे नाव Ascraeus Mons आहे. हे मंगळ ग्रहातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. ESA चा दावा आहे की, Ascraeus Mons ची उंची पृथ्वीतील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टपेक्षा दुप्पट आहे.

रिपोर्टनुसार, एस्क्रेयस मॉन्सच्या उपलब्ध मंगळच्या थारसिस रीजन (Tharsis) मध्ये आहे. हे या क्षेत्रात उपलब्ध तीन ज्वालामुखीतील सर्वात उंच आहे. थारसिस रीजन मंगळ ग्रहाच्या पश्चिम गोलार्थ मध्ये आहे. याला एक ज्वालामुखीय पठार म्हणून ओळखले जाते. एस्क्रेयस मॉन्सची उंची १८ किमी नोंदली गेली आहे. याच्या आधारचा व्यास ४८० किमी आहे. याच्या तुलनेत पृथ्वीमधील सर्वात उंच समजला जाणारे शीखर माउंट एव्हरेस्टची समुद्राच्या तळापासून ८,८४८.८६ मीटर आहे. रिपोर्टनुसार, एस्क्रेयस मॉन्स पेक्षा उंच ज्वालामुखी ओलंपस मॉन्स (Olympus Mons) आहे. ईएसएच्या माहितीनुसार, हे फक्त मंगळ ग्रहावरील उंच नव्हे तर संपूर्ण सौर मंडळचे सर्वात उंच ज्वालामुखी आहे.

वाचाः Window AC च्या किंमतीत Split AC, अर्ध्या किंमतीत घरी घेऊन जाण्याची संधी

मंगळ ग्रहातील दुसरे सर्वात उंच ज्वालामुखीचा फोटो ESA च्या मार्स एक्सप्रेस ऑर्बिटर च्या हाय रिजॉलूशन स्‍टीरियो कॅमेराने यावर्षी १५ जानेवारी रोजी घेतला होता. यात छोटे पांढऱ्या बॉक्स मध्ये हायलाइटची नवीन जागा एस्क्रेयस मॉन्सच्या क्षेत्रात आहे. फोटोत पावोनिस मॉन्स आणि अर्सिया मॉन्स ज्वालामुखी सुद्धा दिसत आहे. फोटोवरून फार समजत नाही. परंतु, एस्क्रेयस मॉन्स शिवाय, दुसरा ऑब्जेक्ट उंची १० किमी पर्यंत कमी आहे. ज्या कॅमेराने हा फोटो घेतला आहे. तो Mars Express ऑर्बिटर वर लावला आहे. हे स्पेसक्राफ्ट २००३ पासून मंगळ ग्रहाची परिक्रमा करीत आहे. त्या ठिकाणी ते मिनिरल्सची मॅपिंग करीत आहे. हे मंगळ ग्रहावरील वातावरणाच्या विविध घटनेचा अभ्यास करीत आहे.

वाचाः अलर्ट! भारतावर चीनचा सायबर हल्ला, घरातील Wi-Fi राउटरची अशी घ्या काळजी

Source link

ESAMars Expressmars express orbiterOlympus MonsTharsisVolcano on Marsमंगळ ग्रह
Comments (0)
Add Comment