नवी दिल्ली :iPhone manufacturing in India : जगातील सर्वात प्रसिद्ध फोन म्हणाल तर ॲपल कंपनीचे आयफोन आणि आता हेच आयफोन भारतातील सर्वात प्रसिद्ध कंपनी टाटा ग्रुप तयार करणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच टाटा ग्रुपने बंगळुरु येथील ॲपल आयफोन तयार करणारी पार्टनर कंपनी विस्ट्रॉनची फॅक्ट्री खरेदी केली होती. ज्यामुळे आता टाटा कंपनी देखील आयफोन तयार करणार असून विशेष म्हणजे भारतात टाटा कंपनीने तयार केलेले फोन्सची विक्री जगभरात होणार आहे.काही रिपोर्ट्सनुसार, टाटा ग्रुपकडुन नरासपुरा इथे ॲपलच्या आयफोन मॉडेल्सचे उत्पादन सुरू करण्याात आले आबे. टाटा ग्रुपने बंगळुरू जवळ विस्ट्रॉनकडून एक फॅक्ट्री खरेदी केली होती. सध्या टाटा ग्रुप किंवा विस्ट्रॉन कंपनीकडून याबद्दल अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी देखील सुत्रांच्या माहितीनुसार विस्ट्रॉन कंपनीने भारतात ॲपल उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे तसंच विस्ट्रॉन कंपनी उत्पादनासाठी नव्या आणि योग्य ग्रुपची पाहणी करणार आहे. तसंच टाटा ग्रुपकडून बंगळुरू जवळच्या विस्ट्रॉनच्या फॅक्ट्रीचा ताबा घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर तिथे उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा ताबा देखील घेतला आहे. सोबतच टाटा ग्रुपकडून या सुविधेशी संबंधित अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या विभागांशी संबंधित जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यात एचआर आणि ऑपरेशनसंबंधित विभागांचा देखील समावेश आहे.
टीम कुक आणि एन चंद्रशेखरन यांची भेट
काही दिवसांपूर्वी ॲपलचे सीईओ टीम कुक भारतात आले होते.त्यावेळी मुंबई आणि नवी दिल्ली इथे ॲपलच्या स्टोर्सचे उद्घाटन करण्यात आले. त्या दरम्यान त्यांनी टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली होती. या भेटीत या दोघांमध्ये भारतातील योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यामुळे ॲपल कंपनी आणि टाटा ग्रुप एकत्र येत सुरू होणारी भागीदारी दिर्घकाळ टिकणारी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यानंतर टाटा ग्रुप हा भारतात आयफोनचे उत्पादन करणारी पहिली कंपनी देेखील ठरणार आहे.
iPhone 15 ही भारतात तयार होणार
विशेष म्हणजे, ट्रेन्ड फोर्सच्या रिपोर्टनुसार यंदा ॲपल आयफोन कंपनी नवे चार आयफोन मॉडेल्स लॉन्च करणार आहे.त्यानुसार चार पैकी दोनचे उत्पादन भारतात घेतले जाणार आहे.ज्यात या वर्षी लॉन्च होणाऱ्या आयफोन १५ ची (iPhone 15) जबाबदारी टाटा ग्रुप घेणार आहे.
वाचाः WhatsApp मध्ये जूनपासून होणार अनेक बदल, या यूजर्सला द्यावे लागतील पैसे