आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)
गेल्या वर्षी आपण सर्वांनीच ChatGPT च्या रुपात AI चॅटबॉट्समध्ये बरेच मोठे बदल पाहिले. ChatGPT आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील एक सर्वाधिक लोकप्रिय उदाहरण आहे. त्याचा वाढता वापर पाहता तज्ज्ञांचे मत आहे की, आगामी काळात चांगले प्रशिक्षण मिळाल्यानंतर अशाप्रकारते चॅटबॉट्समध्ये अनेक कामांमध्ये माणसाची जागा घेऊ शकतात. त्यामुळे २०२३ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा सर्वात मोठा ट्रेंड ठरेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
Metaverse आणि Web 3.0
या वर्षी Metaverse आणि Web 3.0 या युजर एक्सपिरियन्सही पूर्णपणे बदलू शकतो. कारण मेटावर्स म्हणजे एकप्रकारचे आभासी जग जे लोकांना वास्तविक जीवनात पाहता येईल हे असून या Metaverse च्या मदतीने लोक कुठेही प्रत्यक्ष न जाता आभासी घरे, आभासी रस्ते, गाड्या आणि कार पाहू शकतील.पूर्णपणे इमाजिनेशन आणि टेक्नोलॉजीच्या जीवावर एक भारी अनुभव युजर घेऊ शकणार असल्याने हा एक मोठा ट्रेंड असणार आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
सुपर अॅप्स
या वर्षी 2023 मध्ये, सुपर अॅप्सचा वापर आणखी वाढू शकतो. या सुपर अॅप्सद्वारे, वापरकर्ते एकाच अॅपवरून अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम होणार आहेत. दरम्यान एका टेक्नॉलॉजी रिसर्च कंपनीच्या रिपोर्नुसार, येत्या काळात जगभरातील ५० टक्क्यांहून अधिक वापरकर्ते सुपर अॅप्स वापरतील. ज्यामुळे अनेक कामं एका अॅपवरुनच होतील. उदाहरणार्थ एखाद्या फायनान्स रिलेटेड अॅपमधून वापरकर्ते एकाच बचत खाते, क्रेडिट कार्ड, फंड, स्टॉक, किराणा आणि विमा पॉलिसी असं सारंकाही ट्रॅक करण्यास सक्षम असतील.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
ब्लॉकचेन
या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये, आंतरराज्यीय व्यवहार रोखण्यासाठी ब्लॉकचेनचा वापर केला जाईल. क्रिप्टोकरन्सी आणि इतर वैद्यकीय डेटा यासारख्या माहितीचे संरक्षण करण्यात देखील हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. तसेच याचा उपयोग जागतिक पुरवठा साखळी सुधारण्यासाठी देखील केला जाईल, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
हवाई टॅक्सी
आपण गेली कित्येक वर्षे इमॅजिन करत असलेल्या उडत्या वाहनांचे स्वप्न यंदाच्या वर्षी साकार होऊ शकते. या वर्षी तुम्ही फ्लाइंग टॅक्सी देखील पाहू शकता. हेलिकॉप्टर बनवणाऱ्या कंपनी ‘बेल’ने एअर टॅक्सीचा प्रोटोटाइपही तयार केला आहे. २०२३ मध्ये ते ते लॉन्च देखील करू शकतात अशी अपेक्षा आहे. कॅब सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या Uber कंपनी आधीच हेलिकॉप्टर टॅक्सीसह भागीदारीत गुंतलेली आहे. त्यामुळे युबेरच्या उडत्या टॅक्स्या लवकरच पाहायला मिळू शकतात.
वाचा : Smartphone Care : स्मार्टफोन वापरताना चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होईल हजारोचं नुकसान
LiFi तंत्रज्ञान
या वर्षी तुम्हाला LiFi तंत्रज्ञान पाहायला मिळू शकेल. तर हे लायफाय देखील WiFi सारखे एक वायरलेस फीचर आहे परंतु हे WiFi पेक्षा अधिक चांगले तंत्रज्ञान आहे. हे वायफाय पेक्षा कितीतरी पटीने वेगवान आहे. विशेष म्हणजे LED बल्ब लाइटचा वापर LiFi मध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो.
वाचाः मंगळ ग्रहाच्या दुसऱ्या सर्वात उंच ज्वालामुखीचा फोटो आला समोर, याच्या उंचीपुढं एव्हरेस्टही ठेंगणे
5G हायपर-कनेक्टिव्हिटी
5G देशात आणले गेले आहे आणि त्याचा वापर या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये हळूहळू दिसून येत आहे. सध्या देशभर ५जी कनेक्टिव्हिटी पसरण्यास वेळ लागू शकतो. पण यासोबतच यावर्षी भारतात आणखी 5G रेडी उपकरणं विकसित केली जातील कारण त्याचं कव्हरेज विस्तारत आहे. या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये 5G आणि हायपर-कनेक्टिव्हिटी याकडून अधिक अपेक्षा आहेत.
वाचाः ४० हजाराचा 1.5 टनचा स्प्लिट AC फक्त २१ हजारात खरेदीची संधी, १० वर्षाची वॉरंटीही मिळते
वायरलेस लॅपटॉप चार्जर
आतापर्यंत तुम्ही फक्त स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जरबद्दल ऐकले असेल. पण आता तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की आगामी काळात तुम्हाला लॅपटॉपसाठी देखी वायरलेस चार्जर पाहायला मिळतील.पण हे तंत्रज्ञान अद्याप लॅपटॉपच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी पुरेसे शक्तिशाली नाही. पण असं असूनही गेल्या काही वर्षांत झालेला विकास पाहता असा चार्जर लवकरच बाजारात येऊ शकतो.
वाचाः अलर्ट! भारतावर चीनचा सायबर हल्ला, घरातील Wi-Fi राउटरची अशी घ्या काळजी
हरित तंत्रज्ञान
सध्या जगासमोर असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे आपल्या वातावरणात कार्बन उत्सर्जनाला ब्रेक लावणे, जेणेकरून आपण हवामानाच्या संकटाचा सामना करू शकू. यंदा देखील हे प्रदूषण कमी करण्याचा अधिक विचार होऊ शकतो. कार्बन उत्सर्जनाबाबत अनेक देश आधीच चिंतेत आहेत, जर ते अधिकाधिक वाढवले नाही तर आगामी काळात आणखी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि या सर्वासाठी तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर केला जाईल. त्यामुळे यदा हरित तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जाऊ शकतो.
वाचाः Window AC च्या किंमतीत Split AC, अर्ध्या किंमतीत घरी घेऊन जाण्याची संधी
रोबोटचा वापर वाढणार
या वर्षी म्हणजेच २०२३ मध् आणखीये रोबोट्स दिसायला लागतील आणि ते क्षमतेने अधिक माणसासारखे बनतील. रोबोट्सचा वापर वास्तविक जगात इव्हेंट ग्रीटर्स, बारटेंडर, वृद्ध प्रौढांसाठी द्वारपाल म्हणून केला जाऊ शकतो. कृषी आणि बांधकाम यासारख्या अनेक उद्योगांमध्ये रोबोट्स दीर्घकाळापासून कामगारांचा एक भाग आहेत. आता आणखी काही क्षेत्रातही रोबोट्सचा वापर यंदाच्या वर्षात वाढू शकतो.
वाचाः नवीन रेल्वे ॲप लाँच, कन्फर्म तिकिटासोबत मिळेल Netflix ची मजा