Unauthorized School: नवी मुंबईतील पाच शाळा अनधिकृत

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने हद्दीतील पाच अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ मार्च, २०२३ अखेर नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता प्राथमिक शाळा चालविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

आरटीई अधिनियम २००९मधील कलम १८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यानुसार, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाच शाळा मान्यतेशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने या शाळा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या महापालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे. तसेच, परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा तात्काळ बंद करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या शिक्षण विभागाने दिला आहे. तसेच, या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

संस्था व शाळेचे नाव

इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई अल मोमीन स्कूल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर ८ बी, सीबीडी-बेलापूर (इंग्रजी)

ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, आग्रीपाडा इकरा ईस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, सेक्टर २७, नेरूळ (इंग्रजी)

द आटपाडी एज्युकेशन सोसायटी द ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, सीवूड्स, सेक्टर ४०, नेरूळ (इंग्रजी)

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, किसननगर सरस्वती विद्यानिकेतन स्कूल, सेक्टर ५, घणसोली (इंग्रजी)

इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली इलिम इंग्लिश स्कूल, आंबेडकर नगर, रबाळे (इंग्रजी)

Source link

Career Newseducation newsMaharashtra TimesNew Mumbai SchoolNMMCNMMC SchoolSchool ListUnathourised Schoolनवी मुंबई शाळाशाळा अनधिकृत
Comments (0)
Add Comment