कुंडलीत गुरु ग्रहाचा अशुभ प्रभाव आहे हे कसे ओळखावे जाणून घेऊया

ज्योतिषशास्त्रात गुरु हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पति अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एखाद्याच्या लग्नाला उशीर होतो. एवढेच नाही तर गुरू जेव्हा अशुभ असतो तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या कामात प्रसिद्धी मिळत नाही, तसेच कामात यशही मिळत नाही. म्हणूनच गुरुवारी काही उपाय केल्यास कुंडलीतील गुरूचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो.Shani Jayanti 2023: शनैच्छरी जयंतीला राशीनुसार करा हे उपाय, तुमच्यावर राहील शनिदेवाची कृपा

कुंडलीत गुरुचा अशुभ प्रभाव कसा ओळखावा

अशुभ गुरूमुळे व्यक्तीला मानसिक चिंता, आर्थिक नुकसान, आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

याशिवाय गुरूच्या अशुभतेमुळे विनाकारण शिक्षणात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

अशुभ गुरूमुळे जीवनात आदराचा अभाव राहतो. जर तुमच्यामुळे यश मिळाले तरी त्याचे श्रेय इतर कोणाला तरी प्राप्त होते.

Jyeshtha Marathi Month: ज्येष्ठ मास प्रारंभ; तिथी, महिन्याचे महत्व आणि सणउत्सवाची यादी

गुरु ग्रहाची अशुभ स्थिती टाळण्यासाठी करावयाचे उपाय

बृहस्पती ग्रहाच्या अशुभ स्थितीला दूर करण्यासाठी दर गुरुवारी भिजलेली हरभरा डाळ गूळ मिसळून गायीला खाऊ घालावी.

गुरुवारी केळीच्या झाडाचे मूळ पिवळ्या कपड्यात बांधून उजव्या हातात घाला. ते परिधान करण्यापूर्वी पूर्ण विधीपूर्वक त्याची पूजा करावी.

कुंडलीत बृहस्पति अशुभ असेल तर आंघोळीच्या पाण्यात केशर किंवा हळद टाकून आंघोळ करावी. याशिवाय कपाळावर रोज हळद किंवा केशराचा टिळा लावावा.

गुरुवारी मंदिरात मूग डाळ दान करा आणि १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या.

याशिवाय तुम्ही ९ किंवा १२ चमेलीची फुले घेऊन वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकतात. बृहस्पति देवाच्या प्रतिमेवर पिवळे कणेरचे फूल अर्पण करावे.

जून महिन्यात सूर्य, शनिसोबत या ग्रहांचे राशीपरिवर्तन; या ५ राशींच्या लोकांना धनलाभासोबत मिळेल पदोन्नती

Source link

astro tips to strengthen guru upayguru grah has ashubh impact in kundali in marathiguruwar astro tipsguruwar puja vidhiguruwar upay in marathihoroscopeकुंडलीत गुरु ग्रहाचा अशुभ प्रभावगुरु ग्रह उपायगुरु ग्रह कुंडलीत अशुभ आहे कसे ओळखावेगुरुवारी करायचे उपाय
Comments (0)
Add Comment