संत तुकाराम काय सांगून गेले, रागावर कसे मिळवाल नियंत्रण?

संत तुकाराम महाराज म्हणतात, “तीळ जाळीले तांदूळ…. कामं क्रोधे तैसेची खळ…”तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासा पोटी होम हवन करत असतात त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकतं असतात. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नी मध्ये तीळ तांदूळ टाकतात तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं तसाच तुमच्या कडे ठेवतात. तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा होमाला तीळ तांदूळ आहुती देऊन रागही देऊन टाका होमाला आहुती देऊन राग कधीही आपल्याकडे नसावा.

कथा

एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो, जिथे त्याला खूपच तहान लागते. इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही. तहानेमुळे त्याचा घसा सुकतो, त्याची नजर एका झाडावर पडते, जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते. तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागला. जसे तसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणला तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला. त्या द्रोणला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला. त्या द्रोणचे पूर्ण पाणी खाली पडले.

राजा निराश झाला, खुप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि ते ही पक्ष्याने पाडले. परंतु आता काय होऊ शकते. असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरू लागतो. खूप मेहनती नंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे दोन तीन वेळा होते.

आता राजा हताश होऊन क्रोधित होतो, इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय, आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेन. असे मनातल्या मनात ठरवतो. राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणला भरू लागतो. खुप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो.

आता राजा विचार करतो की, या पोपटापासून तर पिच्छा सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विझवेन. म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो. असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो, जिथून पाणी पडत होते. तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या फांदीवर एक भलामोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो, हे देवा! मी हे काय केले. जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मे त्यालाच मारून टाकले. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता, आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा! मी नकळत किती मोठे पाप केले आहे. राजा दुःखी होतो.

म्हणून म्हणतात की, क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खुप नुकसान करून घेतो. राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. “अति राग आणि भिक माग” हि मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. रागावर नियंत्रण ठेवणेच चांगले.

Source link

anger issueshow to control anger issuesmotivational story in marathisant tukaramsant tukaram on how to control anger issuesप्रेरक कथाबोधकथारागावर नियंत्रण कसे मिळवावेरागावर नियंत्रणासाठी संत काय सांगतातसंत तुकाराम
Comments (0)
Add Comment