द केरला स्टोरी चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली पकड निर्माण केली होती. त्यानंतर कमाईचे आकडे हे वाढतानाच दिसून आले होते, मात्र गेले दोन दिवस चित्रपटाच्या कमाईचे आकडे हे कमी झाल्याचं पाहायला दिसून येत होतं. मात्र १३ व्या दिवशी चित्रपटानं तब्बल ९.२५ कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा हा १६५.९४ कोटी इतका झालाय. द केरला स्टोरी चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार असल्याचं चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता कमाईचे आकडे वाढण्याचं कारण म्हणजे ज्या राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तिथली बंदी उठण्याचे आदेशच सुप्रिम कोर्टानं दिलेत. त्यामुळं निर्मात्यांसाठी हा एक मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. यामुळं आत कमाईचे आकडे वाढणार आहेत. तर चित्रपटाला २००कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये.
विपुल शाह यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुदिप्तो सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट दहशतवादी संघटनेनं केलेल्या महिलांच्या तस्करीची सत्यता सांगतोय, असा दावा करण्यात आलाय. या महिलांच्या आयुष्याची हृदयद्रावक गोष्ट यातून मांडण्यात आली आहे. केरळमधल्या मुली ज्यांना नर्स व्हायचं होतं त्या ISISच्या आतंकवादी बनल्या, अशी चित्रटाटी पटकथा आहे.