आता फोनमध्येही सोप्या पद्धतीने वापरता येणार ChatGPT, ॲप झालं लाँच, कसं कराल डाऊनलोड?

नवी दिल्ली : मागील काही काळापासून टेक्नोलॉजीच्या जगतात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात AI ने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. Open AI या कंपनीने तयार केलेला AI चॅटबॉट ChatGPT ची तुफान चर्चा होताना दिसत आहे. लॅपटॉप, पीसीवर मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं हे चॅटजीपीटी आता तुमच्या फोनमध्ये येत आहे. कारण चॅटजीपीटी तयार केलेल्या OpenAI कंपनीने iPhone साठी ChatGPT App लाँच केलं आहे. ज्यामुळे आता आयफोन युजर्स एका डेडिकेटेड ॲपच्या मदतीने फोनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने ChatGPT वापरु शकतात. तर हे ॲप तुम्ही कसं डाऊनलोड कराल? याला काही पैसे मोजावे लागणार का? याचा वापर फोनमध्ये कसा कराल? हे सारंकाही सांगणार आहोत.

वाचा : AI मुळे ‘या’ ३ इंडस्ट्रीमधील लोकांवर पडणार बेरोजगारीची कुऱ्हाड, लेटेस्ट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या हे ॲप फक्त युएसमधील युजर्ससाठी लाँच झालं आहे.तसंच एक चांगली गोष्ट म्हणजे ॲप स्टोरमध्ये हे ॲप मोफत उपलब्ध आहे. तसंच पूर्णपणे ॲडफ्री देखील आहे.आता जरी हे ॲप फक्त युएसमधील युजर्ससाठी लाँच झालं असलं तरी लवकरच इतर देशातील युजर्ससाठीही उपलब्ध होणार आहे. तसंच सध्या आयओएस युजर्ससाठी लाँच झालेलं हे ॲप अँड्रॉईड युजर्ससाठीही उपलब्ध होणार आहे. अशी माहितीही कंपनीने दिली आहे.

वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो
GPT-4 चा वापरही करता येणारChatGPT तयार केलेल्या ओपनएआय या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सध्या युजर्सना चॅटजीपीटीच्या प्लस सब्सक्रिप्शनसाठी अधिकचे पैसै द्यावे लागतात. ज्यानंतर ते पावरफुल लँग्वेज मॉडेल GPT-4 चा वापर करु शकतात. दरम्यान याचा वापरही आता करता येणार असून तूर्तास ChatGPT हे ios युजर्ससाठी फ्री असेल.

वाचा : ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलनं आणलं ‘Google Bard’, मोफत असा करा वापर

Source link

aiChatGPTiphone chatgptiphone usersopen AIआयफोनओपन एआयचॅटजीपीटी
Comments (0)
Add Comment