WhatsApp Chat Lock Feature : WhatsApp ने नुकतेच प्रायव्हेसी फीचर आणले आहे. जर तुम्हाला नेहमी आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड सोबतची चॅटिंग कुणी अन्य तिसरी व्यक्ती वाचेल, अशी भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. कारण, WhatsApp ने आता एक खास Chat Lock Feature आणले आहे. या चॅटला लॉक केल्यानंतर याचा अॅक्सेस फक्त तुम्हाला राहील. अन्य कुणीच तुमच्या दोघांतील चॅटिंग वाचू शकणार नाही. लॉक झाल्यानंतर पूर्णपणे चॅट एका सिक्योर फोल्डरमध्ये असेल. व्हॉट्सअॅप लॉक चॅट्सच्या कंटेटला अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी रोलआउट करणे सुरू केले आहे.
WhatsApp Chat Lock Feature
हे फीचर लॉक चॅटचे एक वेगळे फोल्डर बनवते. जसे आर्काइव्ह चॅट्सचे बनवते. तुम्ही चॅट लॉकच्या या फोल्डरवर क्लिक करून लॉक करण्यात आलेल्या चॅट्सला अॅक्सेस करू शकता. लॉक करण्यात आलेली चॅट, चॅट लिस्टमध्ये दिसणार नाही. जर तुमच्या फोनचा अॅक्सेस कुणी मागितला तरी तुमच्या पार्टनरची चॅट पर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याआधी तुमच्या चॅटला अनलॉक करावे लागणार आहे. हे लॉक चॅट फोल्डर केवळ तुमच्या डिव्हाइस पासवर्ड किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (फिंगरप्रिंट) ने ओपन होईल.

वाचाः Artificial Intelligence मानवी भविष्यासाठी धोकादायक, अर्ध्याहून अधिक अमेरिकन लोकांचं मत, पाहा खास सर्व्हे
WhatsApp Chat कसे लॉक कराल
तुम्हाला तुमचे WhatsApp Chat फीचर चॅट इन्फो सेक्शनमध्ये मिळेल. तुम्हाला ज्या पार्टिकुलर चॅटला लॉक करायचे आहे त्याला ओपन करा. आता इन्फो सेक्शनवर जा. खाली स्क्रॉल करा. नंतर चॅट लॉक ऑप्शन वर क्लिक करा. नंतर तुम्हाला फिंगरप्रिंट वरून चॅटला लॉक करता येऊ शकते. यानंतर चॅट अॅप सिक्योर फोल्डरमध्ये जाईल.
वाचाः आता फोनमध्येही सोप्या पद्धतीने वापरता येणार ChatGPT, ॲप झालं लाँच, कसं कराल डाऊनलोड?
वाचाः फिंगरप्रिंट सेन्सर, HD+ डॉट ड्रॉप डिस्प्ले, जबरदस्त कॅमेराचा फोन लाँच, किंमत फक्त ५९९९ रुपये