आधार कार्ड हरवलंय? टेन्शन नका घेऊ, घरबसल्या मिळवू शकता, फक्त ‘या’ १० स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली :Aadhar Card Update Online : आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हरवल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आधार कार्डशिवाय महत्त्वाच्या कामाला अडकून राहावं लागू शकतं. तसंच तुमच्या आधार कार्डच्या मदतीने कोणीही गैरवापरही करु शकतात. पण आता तुमचं आधार कार्ड हरवलं तर तुम्ही घरबसल्या तुमचं आधार कार्ड डाऊनलोड करु शकता, ते कसं हे आज जाणून घेऊ…

स्टेप १ : UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://ssup.uidai.gov.in/web/guest/ssup-home ला भेट द्या आणि टॅबमधील “रिट्रीव लॉस्ट किंवा फरगॉटन युआयईडी/ईआयडी” पर्यायावर क्लिक करा.

स्टेप २ : मग योग्य ऑप्शन (आधार नंबर किंवा एनरोलमेंट नंबर) यावर क्लिक करा.

स्टेप ३ : त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव, रजिस्टर्ड ईमेल आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर टाका.

स्टेप ४: त्यानंतर स्क्रीनवरील सिक्योरिटी कोड टाका आणि गेट वन टाईम पासवर्ड बटनावर क्लिक करा.

स्टेप ५: मग रजिस्टर्ड ईमेल किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन ओटीपी मिळवा आणि तिथे टाका.

स्टेप ६ : ओटीपी वेरिफाय होताच तुम्ही रजिस्टर्ड ईमेल किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुमचा आधार नंबर किंवा एनरोलमेंट नंबर मिळवाल.

स्टेप ७: मग UIDAI च्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर जाऊन डाऊनलोड आधार या बटनावर क्लिक करा.

स्टेप ८: मग तिथे अपना आधार नंबरवर एनरोलमेंट नंबर, नाव, पिन कोड, कॅप्चा कोड टाका.

स्टेप ९: त्यात गेट वन टाईम पासवर्ड बटनावर क्लिक करुन रजिस्टर्ड ईमेल किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी मिळवा.

स्टेप १०: ओटीपी वेरिफाय होताच तुम्ही आधार कार्डची कॉपी डाऊनलोड करु शकता.

वाचा : AI मुळे ‘या’ ३ इंडस्ट्रीमधील लोकांवर पडणार बेरोजगारीची कुऱ्हाड, लेटेस्ट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Source link

aadhar card lostaadhar card updateaadhar card. aadhar updateuidaiआधार कार्डआधार कार्ड अपडेट
Comments (0)
Add Comment